Mahayuti News : राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा 'फॉर्म्युला' ठरला! भाजप, शिंदे गट अन् 'NCP'तून कोणाला मिळणार संधी?

Governor For Mlc : महाविकास आघाडीचं सरकार कोसळून महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे महाविकास आघाडीनं सुचविलेल्या आमदारांची यादी निकाली निघाली. मात्र...
ajit pawar eknath shinde devendra fadnavis
ajit pawar eknath shinde devendra fadnavissarkarnama
Published on
Updated on

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी महायुतीत हालचालींना वेग आला आहे. नुकतीच शिंदे गटातील आमदारांची विविध महामंडळांवर वर्णी लावण्यात आली आहे. आता राज्यपाल नियुक्त 12 आमदारांची यादीही लवकर राज्यपालांकडे पाठविण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. यात भाजपला सर्वाधिक तर, अजितदादांची राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेला समान संधी मिळण्याची शक्यता आहे.

12 आमदारांचा मुद्दा 'फाइल' धूळ खात पडल्यावाणी प्रलंबित पडला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना 12 आमदारांच्या यादीवर शिक्कामोर्तब करून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली होती. मात्र, कोश्यारी यांनी कोणताही निर्णय घेतला नव्हता. हे प्रकरण न्यायालयात गेलं होतं. त्यानंतर न्यायालयानेही कोश्यारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती.

महाविकास आघाडीचं सरकार कोसळून महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यामुळे महाविकास आघाडीनं सुचविलेल्या आमदारांची यादी निकाली निघाली. मात्र, विधानसभेपूर्वी 12 रिक्त जागांवर नियुक्ती होण्यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Ajit Pawar : मोठी घडामोड! अजितदादांना महायुतीतून बाहेर काढण्यासाठी भाजप अन् शिंदे गटाचं 'चक्रव्यूह'?

याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यात चर्चा झाली. तेव्हा, भाजपला सहा, शिवसेना ( शिंदे गट ) आणि राष्ट्रवादीला ( अजितदादा पवार ) प्रत्येक तीन जागा निर्णय झाल्याचं सांगण्यात येते. विधानसभेच्या दृष्टीनं राजकीय, सामाजिक, निवडणुकीची रणनीती मदत करणारे आणि आक्रमक असलेल्या 12 जणांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाणार आहे.

कुणाला मिळू शकते संधी?

भाजपकडून महिला आघाडीच्या चित्रा वाघ, विजय रहाटकर, माजी आमदार सुधाकर कोहळे, आध्यात्मिक आघाडीचे अतुल भोसले, त्यासह नाशिकचे बाळासाहेब सानप यांची नावे चर्चेत आहेत. तरी, अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी दिल्लीला नावे पाठविण्यात येणार आहे.

ajit pawar eknath shinde devendra fadnavis
Bharat Gogawale : "मला मंत्रिपद मिळत असताना एकानं राजीनाम्याची धमकी दिली होती," भरतशेठ गोगावलेंचा रोख कुणाकडे?

शिवसेनेकडून माजी आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार मनीषा कायंदे, माजी खासदार राहुल शेवाळे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ऐनवेळी दुसऱ्यांनाच संधी देतील, असं बोललं जात आहे.

तर, अजितदादांच्या पक्षातून मुंबई बँकेचे सिद्धार्थ कांबळे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी आमदार बाबा सिद्दिकी आणि माजी खासदार आनंद परांजपे यांच्यापैकी तीन जणांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com