Narendra Modi, mohan Bhagwat, Sanjay Raut.jpg Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊतांचे RSS प्रमुख मोहन भागवतांना पत्र, करून दिली आणीबाणीची आठवण, म्हणाले, 'अंधार...'

Sanjay Raut Mohan Bhagwat : आपल्या ट्विटवरवरून संजय राऊत यांनी सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवत यांना नरकातला स्वर्गची प्रत आज पाठवली आहे.

Roshan More

Sanjay Raut News : संजय राऊत यांचे 'नरकातील स्वर्ग' हे पुस्तक चर्चेत आहे. त्यांनी आपले हे पुस्तक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले होते. आता थेट आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना हे पुस्तक पाठवत एक पत्र देखील पाठवले आहे.

या पत्रात राऊत यांनी म्हटले आहे की, 'माझ्या पुस्तकाची प्रत आपल्या अवलोकनासाठी पाठवत आहे. देशातील लोकशाहीविरोधी राज्यकर्त्यांनी मला खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात टाकले. माझा व माझ्या कुटुंबियांचा छळ केला. माझी कायदेशीर मार्गाने सुटका होऊ नये म्हणून न्याय यंत्रणेवरही दबाव आणला.'

'विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी हा अत्याचार उघडपणे होत असताना सगळेच गप्प राहिले. १९७५ च्या आणीबाणी पर्वात हेच पडले व त्याविरद्ध संघ परिवाराने संघर्ष केल्याचे सांगितले जाते. माझ्या लेखनात अलीकडच्या काळातले अधार युग चित्रित झाले आहे.', असे देखील राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.

आपल्या ट्विटवरवरून राऊत यांनी सांगितले की, सरसंघचालक मोहन भागवत यांना नरकातला स्वर्गची प्रत आज पाठवली. संघ परिवारातील अनेक मित्रांनी पुस्तक वाचून अभिप्राय कळवले आहेत,मी त्यांचा आभारी आहे.

मनसेसोबत युतीबाबत सकारात्मक

संजय राऊत यांनी मनसेसोबत सकारात्मक असल्याचे म्हटले आहे. अमित ठाकरेंनी युतीच्या प्रस्ताव पाठवण्याच्या वक्तव्यावर राऊत म्हणाले, अमित हा गोड मुलगा आहे. मी राज ठाकरे यांच्या घरी देखील जाईल. आमच्यासाठी तो कॅफे नाही तर आमच्यासाठी तर दुसरे घर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT