Eknath Shinde Vs Satej Patil : सतेज पाटलांचा गड उद्ध्वस्त करण्यासाठी शिंदेंचा 'मास्टर स्ट्रोक', गोकुळ झालं आता महापालिकेसाठी बाण सोडला!

kolhapur Politics Shaivsena Congress : मागील आठवड्यात झालेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे.
eknath shinde, Satej Patil And kolhapur municipal corporation
eknath shinde, Satej Patil And kolhapur municipal corporationsarkarnama
Published on
Updated on

Eknath Shinde News : मागील दहा वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर दक्षिण विधानसभा निवडणुकीतून काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांचा पराभव झाल्यानंतर महाडिक गटाची सत्ता असलेल्या सहकारी संस्था आणि स्थानिक संस्थांवरील सत्ता केंद्र ताब्यात घेतली. जिल्ह्याच्या राजकारणात सतेज पर्व सुरू झाले. मात्र राज्यात महायुती स्थापन झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील समीकरणे बदलली. विधानसभा निवडणुकीत थेट तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लक्ष घातल्यानंतर आमदार पाटील यांच्या ताब्यात असलेली महापालिका, गोकुळ दूध संस्था काबीज करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत माजी खासदार संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चार वेळा दौरा केला. मात्र तरीदेखील कोल्हापूरची जागा गमवावी लागली. मात्र या निवडणुकीत दरम्यान प्रचारार्थ शिंदे यांच्यावर झालेली टीका कोल्हापुरातील शिवसैनिकांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. त्यामुळे महाडिक गटांसोबत आता शिंदेंची शिवसेना देखील आमदार पाटील यांच्या गटातील एकेक सत्तास्थाने ताब्यात घेण्याचा चंग बांधला आहे.

मागील आठवड्यात झालेल्या गोकुळ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांना राजीनामा देण्यापासून रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा रोल होता. गोकुळ दूध संघावर आमदार सतेज पाटील यांचे थेट वर्चस्व राहू नये यासाठी महायुतीचाच अध्यक्ष करण्याची भूमिका उपमुख्यमंत्री शिंदे यांची होती. त्यामुळे झाले ही तसेच.

eknath shinde, Satej Patil And kolhapur municipal corporation
Tuljapur drugs case: तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट; माजी नगराध्यक्षाच्या पतीला कोर्टाच्या आवारातून नाट्यमयरित्या ठोकल्या बेड्या

पहिला प्रयत्न यशस्वी

गोकुळ दूध संघावर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्री यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ हे अध्यक्ष झाले. गोकुळ दूध संघ हा कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय आणि आर्थिक सत्ता केंद्राचा प्रमुख भाग आहे. ज्याच्या हातात गोकुळ त्याच्या हातात जिल्ह्यातील राजकारणाची सूत्रे हेच समीकरण आतापर्यंत लागू होत आले आहे. त्यामुळे शिंदे यांचा पहिला प्रयत्न सफल झाला आहे.

काँग्रेसचे नगरसेवक फोडणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेने आपली नजर काँग्रेस नगरसेवकांकडे वळवली आहेत. केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याचा फायदा नगरसेवकांना होईल. पटवून देण्यास शिंदेंची सेना सध्या तरी यशस्वी झाल्याचे दिसून येते.

त्यामुळेच कोल्हापूर महानगरपालिकेतील सतेज पाटील यांचा उजवा हात समजले जाणारे काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख हे शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्यासोबत जवळपास विद्यमान माजी 15 नगरसेवक शिंदेंच्या सेनेच्या वाटेवर असल्याचा दावा केला जात आहे.सतेज पाटील गटातील निवडून येणारे खमके चेहरे देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर आहेत. यामध्ये अनेक धक्कादायक नावे येत्या काळात समोर येणार असल्याची माहिती देखील खात्रीला एक सूत्रांनी दिली आहे.

महाडिकांचाही पाठींबा...

आमदार सतेज पाटील यांनी ज्या पद्धतीने जिल्ह्याच्या राजकारणात मुसंडी मारली. महाडिक गटाच्या ताब्यात असलेली एक एक सत्ता केंद्र ताब्यात घेतली. त्याच पद्धतीने मुंबईतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार सतेज पाटील यांच्या ताब्यातील सत्ता केंद्र ताब्यात घेण्याचा चंग बांधल्याचा दिसून येतो. त्याला अप्रत्यक्षपणे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांचा देखील पाठिंबा त्याचे दिसून येते.

eknath shinde, Satej Patil And kolhapur municipal corporation
Ajit Pawar Politics : 'माझा चेहरा घेऊन जा...', अजित पवारांनी दिले पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर लढण्याचे संकेत

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com