Maharashtra Assembly Election : राहुल गांधींच्या आरोपाला उत्तर देताना बानकुळेंनी 2009 मधील ती आकडेवारी मांडत केली मोठी भविष्यवाणी

Chandrashekhar Bawankule Vs Rahul Gandhi : तुम्ही 2004 आणि 2009 मध्येही निवडणूक जिंकलात, तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं, तेव्हा रडगाणं सुरू झालं आहे, असा टोलाही बावनकुळेंनी लगावला.
Chandrashekhar Bawankule-Rahul Gandhi
Chandrashekhar Bawankule-Rahul GandhiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 07 June : विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा दावा करत भाजपवर ‘निवडणूक चोरी’चा आरोप केला आहे. यात निवडणूक आयोगाची भूमिकाही महत्वपूर्ण ठरली असल्याचे सांगून निवडणूक आयुक्तांची एकतर्फी नियुक्ती, मतदार नोंदणी, खोटं मतदान, टार्गेट बुथ रिगिंगसह सीसीटीव्ही फुटेजची माहिती लपविल्याचाही आरोप केला आहे. त्याला आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उत्तर दिलं आहे. ते देताना बावनकुळेंनी २००९ मधील आकडेवारीच मांडली आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) एका दैनिकात लिहिलेल्या लेखात महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत भाष्य केले आहे. विशेषत: वाढलेल्या मतदानाबाबत त्यांचा पहिल्या दिवसापासून आक्षेप आहे. तसेच, निवडणूक आयोगाकडून त्या दिवसाचे सीसीटीव्ही फुटेजही उपलब्ध करून दिले जात नाही, त्यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आरोपाला चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी आकडेवारी मांडून उत्तर दिले आहे. ते म्हणाले, राहुल गांधी म्हणतात महाराष्ट्रात 5 महिन्यांत 39 लाख मतदारांची वाढ ‘संशयास्पद’ आहे. पण, राहुलजी 2009 ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो.

एप्रिल 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते, तर ऑक्टोबर 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले होते. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते! तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या, असे आवाहन बावनकुळेंनी केले आहे.

तुम्ही 2004 आणि 2009 मध्येही निवडणूक जिंकलात, तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत! आज पराभव झाला, महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं, तेव्हा रडगाणं सुरू झालं आहे, असा टोलाही बावनकुळेंनी लगावला.

ते म्हणाले, राहुलजी आकड्यांचं अर्धवट वाचन करून देशाला गोंधळात टाकण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. स्वतःचं अपयश लपवण्यासाठी दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा आत्मपरीक्षण करा. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला नाकारलं. आता बिहारमधील जनताही तुम्हाला हद्दपार करणार आहे. त्याच भीतीतून तुम्ही आतापासून पराभवाचं कारण देत आहात.

आमच्या महायुतीला महाराष्ट्रातील जनतेने बहुमताने निवडून दिले. जनतेने आमच्यावर दाखविलेला हा विश्वास आहे. तो पुढील निवडणुकीतही असाच अभंग राहील. आपण वारंवार खोटे बोलून राज्यातील जनदेशाचा अपमान करीत आहात. जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, असा इशाराही दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com