Uddhav Thackeray, Sanjay Shirsat, Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Shivsena News : 'प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंच्या हाती, मग महाविकास आघाडीची नैया डुबली म्हणून समजा'; शिंदे गटाचा टोला

Jagdish Patil

Sanjay Shirsat On Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा उद्धव ठाकरेंच्या हाती दिली तर मग यांची नैया डुबली म्हणून समजा, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरेंना टोला लगावला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेना (ठाकरे गट) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी इंडिया आघाडीतील बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यांच्या या दौऱ्यावरुन विविध चर्चांना उधाण आलं होतं.

राज्यातील महाविकास आघाडीचा प्रमुख चेहरा म्हणून उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) नाव समोर येणार असल्याचंही सांगितलं जात होतं. अशातच आता विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचारप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे दिला असून विधानसभा निवडणुकीत ते आघाडीचे नेतृत्व करणार असल्याचं बोललं जात आहे.

याच चर्चांवरुन शिवसेना (Shivsena) नेते संजय शिरसाट यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. तसंच शिरसाट यांनी सरकारी योजनांवर आक्षेप घेणाऱ्या विरोधकांचा समाचार देखील घेतला आहे. शिरसाट यांनी लाडकी बहीण योजनेचं समर्थन करत विरोधकांवर निशाणा साधला. ते म्हणाले, "महायुती सरकारने ज्या घोषणा केल्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. महिलांच्या अकाऊंटमध्ये जेव्हा 3 हजार रुपये जातात तेव्हा काय आनंद होतो हे सर्वसामान्य कुटुंबांनाच माहिती आहे.

त्यामुळे, आज त्याच्या घरात दिवाळी सुरु आहे. एकनाथ शिंदे साहेबांचे वैशिष्ट्य आहे की, ते जे बोलतात तेच करतात. काही लोकांनी टीका करण्याचा प्रयत्न केला. काही लोकांचा पोटशूळ उठला मात्र त्यामुळे काहीही होत नाही." तर लाडकी बहीण योजनेबद्दल चर्चा कधी सुरू होतात, जेव्हा कोणी काही देत, तुम्ही का दिलं नाही? हा माझा प्रश्न आहे.

तुम्ही अंगणवाडी, बालवाडी सेविकांना काही दिलं नाही, मात्र, या सरकारने त्यांना सर्वकाही दिलं. तुम्हाला जेव्हा संधी होती तेव्हा तुम्ही लोकांना भेटत नव्हता, तुमच्याकडे सांगण्यासारखं काही नाही म्हणून फक्त टीका करतात. मात्र काही देण्यासाठी दानत असावी लागते, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचारप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे दिल्याच्या चर्चांवर बोलताना शिरसाट यांनी ठाकरेंना टोला लगावला. ठाकरेंकडे प्रचाराची धुरा दिली तर मग आघाडीची नैया डुबली म्हणून समजा.

डिव्हिजन वाईज चार सभा होतील आणि प्रचार संपेल. काँग्रेस आणि शरद पवार धुरा वगैरे देणार नाहीतच. परंतु जबाबदारी घेण्याची सुद्धा यांची मानसिकता नाही. त्यामुळे लोकांना प्रश्न पडतोय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आहेत की संजय राऊत? अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना डिवचलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT