BJP Politics : महाविकास आघाडीत ठाकरेंवर मोठी जबाबदारी! भाजपची पहिली प्रतिक्रिया, 'खोट्या बातम्या...'

BJP Politics Atul bhatkhalkar Uddhav Thackeray : स्वतःच्या मतदारांचा बेस न राहिल्यामुळे महाविकास आघाडी निवडणूक जिंकणार नाही, असा दावा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रचारप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे दिला असल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे नेतृत्व करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. मात्र, ठाकरे महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख होणार, यावर भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

'उद्धव ठाकरे महाभकास आघाडीचा चेहरा आहे. या बातम्या पेरण्याची वेळ त्यांच्यावर आली एवढी दारूण आणि दयनीय अवस्था त्यांची झाली.', असा घणाघात भातखळकर यांनी ठाकरेंवर केला आहे.

विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 100 जागा सुद्धा मिळणे मुश्किल आहे. अशी त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. स्वतःच्या मतदारांचा बेस न राहिल्यामुळे महाविकास आघाडी निवडणूक जिंकणार नाही, असा दावा भातखळकर यांनी केला आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: विधानसभा निवडणुकीत आघाडीकडून उद्धव ठाकरेंवर मोठी जबाबदारी

जनतेला कोविडमध्ये वाऱ्यावर सोडणारा, भ्रष्टाचार करणारा, मुख्यमंत्री असताना मंत्रालयात न जाणारा, जनतेला आमदारांना न भेटणारा असा चेहरा जनतेला कधीच आवडला नाही. त्यामुळेच खोट्या बातम्या पसरवून स्वतःचे राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत.

खोट्या बातम्या पेरून स्व:तचं राजकीय अस्तित्व जगवण्याची दारूण अवस्था उद्धव ठाकरेंवर आली आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली.

महायुती सत्तेत येणार!

महाविकास आघाडीने कितीही प्रतत्न करू द्या. कोणताही चेहरा घेऊद्या पण मी येवढंच सांगेल की जनतेने ठरवलं आहे की महायुतीला चांगल्या मतांनी निवडून द्यायचं. राज्यात महायुतीचे सरकारच येणार, असा विश्वास भातखळकर यांनी व्यक्त केला.

जी लोकं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेला विरोध करत आहेत. ते लोक कोलकत्ता मधील झालेल्या महिला अत्याचाराबाबत चुप्पी धरून का बसलेत? हा सवाल जनता विचारल्याशिवाय राहणार नाही, असे देखील भातखळकर म्हणाले.

Uddhav Thackeray
Rahul Gandhi : राजनाथजी, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती! राहुल यांची जागा चुकली, काँग्रेस भडकली, सरकारचे उत्तर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com