Sanjay Shirsat on Anand Dighe Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat on Anand Dighe Death : 'आनंद दिघे यांचा घात झाला, हे...' ; संजय शिरसाटांच्या वक्तव्याने नवा वाद उफाळणार?

Shivsena Sanjay Shirsat News : '...म्हणून आजही ठाण्यातील जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, ते म्हणतात की दिघेंचा घात झाला, त्यांना मारलं गेलं.' असंही शिरसाट यांनी सांगितलं आहे.

Mayur Ratnaparkhe

Sanjay Shirsat and Anand Dighe News : शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांना मारलं गेलं, हे संपूर्ण ठाणे जिल्ह्याला माहीत आहे. असं विधान शिवसेना(शिंदे गट)आमदार संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. तर निवडणुका सुरू झाल्याकी असं बोललंच जातं, असं आनंद दिघे यांचे पुतणे व शिवसेना(ठाकरे गट) नेते केदार दिघे यांनी म्हणत यावर प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिसरसाट(Sanjay Shirsat) म्हणाले, 'ही वस्तूस्थिती आहे, त्यांना काय माहीत. तसा घटनाक्रम आहेच, मूळात आहे. आनंद दिघे यांना मारलं गेलं हे अख्खा ठाणे जिल्हा जाणतो आहे. दुपारी रुग्णालयातून आनंद दिघे यांना सुट्टी मिळणार असते आणि ते अचानक बोलता, चालता मरतात? हृदयविकाराचा झटका दाखवला जातो. काही गोष्टी लोकांच्या लक्षात आहेत, त्या कालांतराने पुढे येतील.'

'आनंद दिघेंच्या(Anand Dighe) डोक्याला मार लागलेला नव्हता, ते बेशुद्ध नव्हते, दिघेंना कुठे मार लागला होता, त्यामुळे मृत्यू होण्याचं काही कारण आहे का, तर नाही. सर्व झाल्यानंतर त्यांना जेव्हा रुग्णालयातून सुट्टी देण्याची वेळ आली तेव्हाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं का दाखवलं जातं? म्हणून आजही ठाण्यातील जी काही ज्येष्ठ मंडळी आहेत, ते म्हणतात की दिघेंचा घात झाला, त्यांना मारलं गेलं.' असं संजय शिरसाट यांनी बोलून दाखवलं आहे.

त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते -

शिवाय, 'त्या रुग्णालयास आग लागली होती, शेकडो रुग्ण होते तेथे, लोक मेले असते. सिलिंडर घेवून लोक सर्वकाही जाळाच्या मार्गावर होते. त्या सगळ्यांना वाचवण्याचं काम तेथील सर्व शिवसैनिकांनी केलं. त्या सर्व शिवसैनिकांमध्ये एक एकनाथ शिंदे हे अग्रस्थानी होते.' असंही शिरसाट यांनी म्हटलं आहे.

तसेच, 'आनंद दिघे हे ठाण्यापासून मातोश्रीपर्यंत जायचे तो काळच तसा होता. तिथं आमचं दैवत बसलेलं होतं आणि त्यांच्याकडे गेल्यानतर प्रत्येक गोष्टीचं समाधान होतं. परंतु आता आम्ही जरी ठाण्याहूनच नाहीतर महाराष्ट्रातूनही मातोश्रीवर गेलो, तर मातोश्रीचं लोक हे सिल्व्हर ओकवर बसलेले असतात, मग आम्ही जायचं कुणाकडे?, आम्हाला तिकडे सिल्व्हर ओकवर जायचं नव्हतं म्हणून आम्ही सुरत मार्गे गुवाहाटीला गेलो होतो, हे यांना लक्षात यायला थोडा वेळ लागेल.' असे संजय शिरसाट यांनी सांगितलं आहे.

केदार दिघे यांनी काय म्हटलं? -

तस संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना(ठाकरे गट) नेते आणि आनंद दिघे यांचे पुतणे, केदार दिघे(Kedar Dighe) यांनी सांगितले की, 'वेळोवेळी निवडणुका आल्या आणि स्वत:च हीत नसेल जर का दिसत, तर आपण दिघे साहेबांच्या नावाने राजकारण कारयचं. अनेक वर्ष हेच चालत आलं आणि आज देखील, अशाच पद्धतीचं वक्तव्यं जर का संजय शिरसाट यांनी केलं असेल, एवढं खात्रीपूर्वक जर का ते असेल, कारण गेली २३ वर्षे जेव्हा जेव्हा हा प्रश्न मांडला गेला तेव्हा मी विचारलेलं आहे की, तुमच्याकडे पुरावे असतील तर समोर आणा मी न्यायालयात जाण्यास तयार आहे. आजतागायत अशापद्धतीने कोणी काहीही बोललेलं नाही. तुमच्या स्वत:च्या स्वार्थासाठी तुम्ही अशी काहीही वक्तव्य करायची, लोकांना भ्रमात टाकायचं, तुमच्याकडची प्रश्नचिन्हं मांडायचे पण त्यांना उत्तर तुम्ही देणार नाही.'

याचबरोबर, 'मी वेळोवेळी दिघे साहेबांचा पुतण्या म्हणून आणि दिघे साहेबांना अग्नी दिल्यामुळे, हे आव्हानात्मक सगळ्यांना बोललेलो आहे की ज्यांच्या कुणाकडे असे पुरावे जर का असतील, तर ते समोर आणावेत. आजतागायत गेल्या २३ वर्षांमध्ये लोकांना फक्त भूलथापा द्यायच्या, त्यांना कुठतरी भ्रमात ठेवायचं आणि कोणत्याही पद्धतीचं सत्य हे लोकांसमोर आणायचं नाही. आणि ज्या काही गोष्टी झाल्या त्यावर आपण स्वत:ची भाकरी कशी भाजू शकू यासाठी जे फक्त यावर राजकारण सुरू आहे, हे दुर्दैवी आहे.' असंही केदार दिघे यांनी म्हटलं आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT