Kedar Dighe News : केदार दिघेंचा होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गट, भाजपवर हल्लाबोल

Political News : राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला.
kedar Dighe Eknath Shinde  Anand Dighe
kedar Dighe Eknath Shinde Anand Dighesarkarnama
Published on
Updated on

Thane News : दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट व शिवसेना शिंदे गट यांच्यात आडवा विस्तवही जात नाही. दोन्ही गटाकडून कुठल्या ना कुठल्या कारणावरून सातत्याने एकमेकांवर टीका केली जाते. त्यामुळे सदैव या ना त्या कारणाने दोन्ही गटाकडून नेहमीच आरोप-प्रत्यारोप केले जातात. त्यामुळे राजकीय वातावरण नेहमीच तापलेले असते. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला.

ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे (Kedar Dighe) यांनी होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे. ठाणेकर जनतेच्या न्यायालयात त्यांनी पक्ष कुणी चोरला असा जाहीर सवाल विचारला आहे. दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, असेही त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून बजावले आहे. (Kedar Dighe News)

शिवसेना ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गटाच्या हिंदुत्वावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. धर्मवीर चित्रपटाच्या ट्रेलरमधून धर्मवीर आनंद दिघे यांना कमी दाखवण्याचा प्रयत्न चित्रपटात निर्मात्याने केला असता त्यावरही केदार दिघे यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला होता.

पक्ष कुणी चोरला? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही, अशा आशयाचे बॅनर लावून शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. काय आहे हिंदुत्व? असा प्रश्न विचारत दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का ? याबाबत केदार दिघे यांनी ठाणेकर जनतेच्या प्रतिक्रिया एका व्हाट्सअप नंबरवर मागवल्या आहेत.

kedar Dighe Eknath Shinde  Anand Dighe
Video Bachchu Kadu : बच्चू कडूंची सटकली! अधिकाऱ्याच्या कानाखालीच लगावली; नेमकं काय घडलं?

दिघे साहेब हिंदुत्व का सोडतील असा प्रश्न त्यांनी शिंदे गटाला आणि चित्रपट निर्मात्यांना विचारला होता. मातोश्री, बाळासाहेब ठाकरे आणि ठाण्यातील शिवसेना हे एक समीकरण असून या समीकरणाला डाग लावण्याचे काम शिंदे गट करत असल्याचे मत याआधीच केदार दिघे यांनी व्यक्त केले आहे.

ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी होर्डिंगच्या माध्यमातून शिंदे गटावर हल्लाबोल केला असून पक्ष कुणी चोरला ? असा जाहीर सवाल ठाणेकर ठाणेकर जनतेच्या न्यायालयात विचारला आहे. दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व नाही असेही त्यांनी या बॅनरच्या माध्यमातून बजावले आहे. पक्ष कोणी चोरला हे विचारताना, काय आहे हिंदुत्व? दुसऱ्याची गोष्ट चोरणे हे हिंदुत्व आहे का ? याबाबतच्या प्रतिक्रिया ठाणेकरांनी नोंदवण्यासाठी केदार दिघे यांनी 9820055066 हा व्हाट्सअप नंबर जाहीर केला आहे.

kedar Dighe Eknath Shinde  Anand Dighe
Ashok Chavan News : `हवा बहोत तेज चल रहा है`, अशोकराव...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com