Sanjay Raut, Raj Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: संजय शिरसाटांकडून राज ठाकरेंचा संदर्भ देत संजय राऊतांना खोचक टोला; म्हणाले, कुठे जायचं...

Sanjay Shirsat: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्य विधानावर मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे.

Amit Ujagare

Sanjay Shirsat: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्य विधानावर मंत्री संजय शिरसाट यांनी संजय राऊतांना टोला लगावला आहे. राज ठाकरेंनी कुठे जावं हे आता संजय राऊत ठरवणार आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. यावरुन आता पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिरसाट नेमकं काय म्हणालेत?

संजय शिरसाट म्हणाले, "राज ठाकरेंनी कुठं जावं, कुठे जाऊ नये? याच्या आचारसंहिता आता यांनीच तयार कराव्यात का? महाराष्ट्राची अस्मिता जपणारे महाराष्ट्रात अनेक मान्यवर नेते आहेत. मी कोणा एका पक्षाच्या नेत्याचं नाव घेत नाही. अनेक लोक आहेत त्यांना महाराष्ट्राच्या अस्मितेचं जतन कसं करायचं याची माहिती आहे. त्यामुळं संजय राऊतांसारख्या डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्यानं अशी विधानं करणं हे लोकांना आवडत सुद्धा नाही आणि लोक त्याच्याकडं लक्षही देत नाहीत"

नेमकं प्रकरण काय?

नुकतीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिंदेंच्या ठाण्यातील बंगल्यावर भेट झाली. या भेटीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी म्हटलं होतं की, हे अस्मिता आणि स्वाभिमानाचे शत्रू आहेत. यावर शिरसाट म्हणाले, संजय राऊतांना अस्मिता हा शब्द कळतो का? अस्मिता कशाला म्हणतात दरवेळी मराठीचा मुद्दा काढायचा. मराठीच्या अस्मितेसाठी म्हणजे उबाठाची ही सर्व ठेकेदारी आहे. मराठीचा मुद्दा, मराठीची अस्मिता, हिंदुत्व हे सर्व कोणाचं तर उबाठाचंच असं हे सांगतात. पण महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी हे जे काही ढोंगं करताहेत ना? ते महाराष्ट्रानं आता ओळखलं आहे. राज ठाकरेंनी कुठे जायचं कुठे नाही? त्यांच्या आचारसंहिता देखील आता त्यांनीच तयार करायच्या का? अशा शब्दांत शिरसाट यांनी राऊतांना उत्तर दिलं आहे.

राज ठाकरेंना सोबत घेणार

महाराष्ट्र आयसीयूत नाही. कोरोनाच्या काळात आणि महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्र आयसीयूत होतो तो आता त्यातून बाहेर पडत आहे. ही सूज उतरवण्याचं काम महायुती सरकारनं केलं आहे. महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आम्हाला सर्वांची गरज आहे. यासाठी राज ठाकरेंचं देखील सहकार्य आम्ही घेणार आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT