Nitesh Rane, Eknath Shinde, Sanjay Raut Sarkarnama
महाराष्ट्र

Nitesh Rane : "त्यांचा संजय राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा..."; नितेश राणेंनी थेट शिंदेंच्या शिलेदारालाच डिवचलं

Nitesh Rane on Sanjay Shirsat statement : "मला संधी मिळाली तर मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन", असं मोठं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिरसाट यांना टोला लगावला आहे.

Jagdish Patil

Chandrapur News, 02 Feb : "मला संधी मिळाली तर मी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करेन", असं मोठं वक्तव्य शिंदेच्या शिवसेनेचे (Shivsena) नेते संजय शिरसाट यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावरून आता भाजप नेते नितेश राणे यांनी शिरसाट यांना टोला लगावला आहे.

"संजय शिरसाट आमचे मित्र आहेत. फक्त त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे." असं म्हणत मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी शिरसाटांना डिवचलं आहे. ते चंद्रपूरमध्ये बोलत होते. यावेळी राणे यांनी महायुतीतसगळे खुश आहेत. शिंदेसाहेब, अजितदादा, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आपआपल्या खात्याचं काम सांभाळत असल्याचं सांगत युतीत काही धुसफूस सुरू नसल्याचं स्पष्ट केलं.

संजय शिरसाट काय म्हणाले?

एका मुलाखतीत बोलताना संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी ठाकरे आणि शिंदेसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, दोन शिवसेना झाल्याचं फार दु:ख होतं. ठाकरे गटातील नेत्यांचं आणि पदाधिकाऱ्यांशी आमचं नातं तसंच आहे. मात्र, मनामध्ये जे अंतर पडलं आहे, तो त्या पक्षात, मी या पक्षात असं जे झालं आहे हे आवडत नाही.

मला संधी मिळाली तर मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करेन. पण दोघांची तार जुळली पाहिजे. त्या दोघांची तार जुळत असेल तर त्यासाठी माझा काहीही अक्षेप नाही. तसेच प्रयत्न हा एका बाजूने होऊन चालत नाही. मात्र, त्यासाठी पुढाकार कोण घेईल? हे देवालाच माहिती."

नितेश राणे नेमकं काय म्हणाले?

शिरसाट यांच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नितेश राणे म्हणाले, "हो ठीक आहे, तसे प्रयत्न करावेक. पण त्याबाबत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या इथर आमदारांच काय मत आहे, याचाही विचार त्यांनी करावा. संजय शिरसाट आमचे मित्र आहेत पण त्यांचा संजय राजाराम राऊत होऊ नये एवढीच अपेक्षा आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT