Baba Ramdev : बाबा रामदेव यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट, नेमकं प्रकरण काय?

Baba Ramdev legal issues : योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात केरळमधील एका न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Baba Ramdev
Baba RamdevSarkarnama
Published on
Updated on

Kerala News, 02 Feb : योगगुरू बाबा रामदेव यांच्याविरोधात केरळमधील एका न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यामुळे आता बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. विविध कारणांमुळे देशातील विविध न्यायालयांमध्ये पतंजलीच्या (Patanjali) उत्पादनांसंदर्भात खटले दाखल करण्यात आले आहेत.

अशीच याचिका केरळमधील पलक्कड जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. मात्र, या याचिकेच्या सुनावणीवेळी बाबा रामदेव (Baba Ramdev) आणि पतंजली योगपीठाचे अध्यक्ष आचार्य बालकृष्ण गैरहजर उपस्थित न राहिल्याने या दोघांविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केरळच्या (Kerala) ड्रग्ज इन्स्पेक्टरने दिव्या फार्मसीविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी खटल्याच्या सुनावणीला रामदेवबाबा आणि आचार्य बालकृष्ण गैरहजर राहिले. त्यामुळे न्यायालयाने दोघांविरुद्ध 15 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे अजामीनपात्र वॉरंट बजावलं. याआधी न्यायालयाने 1 फेब्रुवारी रोजी जामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

Baba Ramdev
Sanjay Ruat : दिल्लीतून एकनाथ शिंदेंचा फोन टॅपिंग? त्यांच्याच आमदाराने दिली माहिती, राऊतांचा खळबळजनक दावा

तर हे सर्व प्रकरण दिव्या फार्मसीने प्रकाशित केलेल्या कथित दिशाभूल करणाऱ्या वैद्यकीय जाहिरातींशी संबंधित आहे. दरम्यान, बाबा रामदेव आणि पतंजली आयुर्वेद लिमिटेड यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत. या प्रकरणी पतंजलीला दंड देखील ठोठावला होता.

Baba Ramdev
Amol Khatal to Raj Thackeray : 'राजसाहेब, मुंबईच्या बाहेर..' ; थोरांतांचा पराभव करणाऱ्या खताळांनी राज ठाकरेंना लगावला टोला!

नुकतंच पतंजली कापूर उत्पादनांच्या विक्रीवर बंदी प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने 4 कोटींचा दंड ठोठावला होता. तर इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) ने बाबा रामदेव यांच्यावर कोविड-19 बरा करण्याचा दावा करत आधुनिक औषधांना निरुपयोगी ठरवल्याचा आरोप केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com