Santosh Deshmukh Murder Case : बीड जिल्ह्यातील मस्सोजग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा देण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड हे अटकेत आहेत त्यांच्यासह आठ जणांवर मकोका अंतर्गत कारवाई केली गेली आहे. मात्र, विरोधक मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम आहेत.
मुंडेंच्या राजीनाम्या विषयी सांगलीच्या दौऱ्यावर असलेले उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, 'मुख्यमंत्री म्हणून निर्णय घेण्यास देवेंद्र फडणवीस हे समर्थ आहेत. त्यांचा जर वाटले या प्रकरणात तथ्य आहे तर ते धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला लावतील'
पाटील म्हणाले, संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास पोलिस यंत्रणेकडून सुरू आहे, एसआयटी तपास करत आहेत. तसेच निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमली आहे. सर्व आरोपींची संपत्ती टप्प्याटप्प्याने मकोका लावण्यापर्यंत तसेच वाल्मिक कराडवर देखील 302 मध्ये घेतील.
चंद्रकांत पाटील यांनी याआधी देखील पुण्यामध्ये बोलताना पाटील यांनी, देवेंद्र फडणवीस यांनी याआधी मुख्यमंत्रिपद, उपमुख्यमंत्रिपद आणि गृहमंत्रिपद भुषवले आहे. त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे. काही विषय निष्कर्षा पर्यंत येत नाहीत तोपर्यंत ते निर्णय घेत नाहीत. मात्र, एकदा का ते निष्कर्षापर्यंत आले तर कुणाला सोडत नाही, असे म्हणत मुंडे दोषी असतील तर त्यांच्यावर फडणवीस कारवाई करतील असे म्हटले होते.
महायुतीमध्ये पालकमंत्रिपदावरून अजुनही वाद सुरू आहेत. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या नियुक्तीला स्थगिती दिली गेली आहे. यावर चंद्रकांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, कुटुंबामध्ये रुसवे फुगवे असतात. आमचे कुटुंबप्रमुख मुख्यमंत्री फडणवीस आहेत. ते दावोसमध्ये होते. ते परत आले आहेत. त्यामुळे ते रुसवे फुगवे काढतील.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.