Valmik Karad-Dhananjay Munde  Sarkarnama
महाराष्ट्र

Dhananjay Munde : वाल्मिक कराडच्या अटकेनंतर धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Dhananjay Munde First reaction Valmik Karad Arrest : वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर सरेंडर केल्यानंतर न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. कराड यांच्या अटकेनंतर दोन दिवसांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Roshan More

Dhananjay Munde : वाल्मिक कराड याने सीआयडीसमोर सरेंडर केल्यानंतर त्याला केज पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांनी त्याला न्यायालयाच्या समोर हजरे केले असता पोलिसांनी त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. वाल्मिक कराडच्या अटकेनंतर दोन दिवसांनी मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिला आहे.

धनंजय मुंडे म्हणाले, मी राजीनामा का द्यावा? या प्रकरणात मी आरोपी नाहीये, या प्रकरणाचा माझा अर्थाअर्थी संबंध नाही. या प्रकरणात आऊचा बाऊ करायचा, कुणाचा तरी राजीनामा मागायचा त्याच पद्धतीने काही जण माझा राजीनामा मागत आहेत.

संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टासमोर चालवावे. जे आरोपी असतील त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. अधिवेशनात देखील मी फास्टस्ट्रॅक कोर्टात हे प्रकरण चालले पाहिजे, अशी मागणी केली पाहिजे.

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधक करत आहेत. त्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, कोणी काय बोलाव, कोणाचं काय होणार याला काही अर्थ नाही.हा तपास न्यायालयीनपण होणार आहे. त्यामुळे मी मंत्री म्हणून त्यावर प्रभाव पाडू शकत नाही. या प्रकरणाची सीआयडी, न्यायालयीन, एसआयटी अशा प्रकारे चौकशी सुरू होणार आहे, असे देखील मुंडे म्हणाले.

पालमंत्रिपद मिळणार?

बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद हे धनंजय मुंडे यांना देऊ नये, अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. याबाबत मुंडे यांना प्रश्न विचारले असता ते म्हणाले, मी पालकमंत्री का नसावं? पालकमंत्रिपदाबाबत निर्णय अजितदादा घेतील.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून मुंडेंची पाठराखण

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ, दत्तात्रेय भरणे, नरहरी झिरवळ यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. तपासात दोषी अडथळ नाही तोपर्यंत राजीनामा देण्याची आवश्यकता नाही तसेच मंत्र्याच्या मित्राने गुन्हा केला असेल तर त्याला मंत्र्याला जबाबदार कसे धरणार, असे दत्तात्रेय भरणे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT