Delhi Assembly Election : दिल्लीच्या राजकारणात दाऊदची एन्ट्री; मुख्यमंत्री अन् केंद्रीय मंत्र्यांमध्ये जुंपली...

CM Atishi Union Agriculture Minister Shivraj Singh Chauhan Dawood Ibrahim controversy : शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मुख्यमंत्री आतिशी यांना पत्र लिहिले आहे.
Atishi, Shivraj Singh Chauhan
Atishi, Shivraj Singh ChauhanSarkarnama
Published on
Updated on

New Delhi News : दिल्लीतील विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली असून राजकारणही तापू लागले आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी फडू लागल्या आहेत. आता या राजकारणात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची एन्ट्री झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या पत्रावरून मुख्यमंत्री आतिशी यांनी त्याला प्रत्युत्तर देताना सणसणीत टोला लगावला आहे.

भाजपकडून आम आदमी पक्षावर सातत्याने टीका केली जात आहे. यापार्श्वभूमीवर चौहान यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, आपचे सरकार शेतकऱ्यांविषयी उदासीन आहे. शेतकऱ्यांविषयी सरकारला कसल्याही संवेदना नाहीत. केजरीवाल आणि आतिशी यांनी कधीही शेतकरी हिताचे निर्णय घेतले नाहीत. केवळ निवडणुकीआधी केजरीवालांनी मोठ्या घोषणा करत राजकीय फायदा उचलला.

Atishi, Shivraj Singh Chauhan
Bhopal Gas Tragedy : हजारो लोकांचा तडफडून मृत्यू, 40 वर्षांनंतर हलवला घातक कचरा; रात्रीत लावली विल्हेवाट

आतिशी यांचा पलटवार

शिवराज सिंह यांच्या पत्रावर आतिशी यांनीही पलटवार केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपचे शेतकऱ्यांविषयी बोलणे म्हणजे, दाऊदने अहिंसेवर प्रवचन देण्यासारखे आहे. भाजपच्या सरकार असताना शेतकऱ्यांचे जेवढे हाल झाले, तेवढे कधीही झाले नाहीत, असा टोला आतिशी यांनी लगावला आहे.

पंजाबमधील शेतकरी आमरण उपोषणाला बसले आहेत. पंतप्रधानांना त्यांच्या बोलण्यास सांगा. भाजपच्या सत्ताकाळात शेतकऱ्यांवर लाठ्या चालवण्यात आल्या. शेतकऱ्यांवर राजकारण करणे थांबवा, असे टीकास्त्रही आतिशी यांनी सोडले आहे. यापूर्वी भाजपच्या अनेक नेत्यांनी केजरीवाल व आप सरकारवर टीका केली आहे.

Atishi, Shivraj Singh Chauhan
Central Govt : 18 माजी मंत्र्यांसह 12 खासदारांची सुरक्षा काढली जाणार, पोलिसांनी गृहमंत्रालयाला पाठवलेल्या अहवालात 'या' नावांचा समावेश

दरम्यान, शिवराज सिंह चौहान यांनी आपच्या मोफत विजेच्या घोषणेवरूनही टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आपकडून मोफत वीज देण्याचे बोलले जात आहे, पण दिल्लीत आप सरकारने शेतकऱ्यांसाठी विजेचे दर वाढवून ठेवले आहेत. सिंजनसाठी कमी दरात वीज मिळणे आवश्यक आहे. पण शेतकऱ्यांना औद्योगिक दराने वीज दिली जात असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com