Anjali Damania, Ajit Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Anjali Damania News : दमानियांचा अजितदादांशी 36 चा आकडा, तरीही भेट घेणार; मोठं कारण आलं समोर...

Ajit Pawar Politics Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा अंजली दमानिया यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.

Rajanand More

Mumbai News : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या नेत्याशी त्यांचा 36 चा आकडा आहे, त्यांची भेट घेणार आहेत. याचे कारणही मोठे आहे. त्यांनीच सोशल मीडियात पोस्ट करून याबाबत माहिती दिली आहे.

दमानिया यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती दिली आहे. त्यासाठी पवारांकडे भेटीची वेळही मागितली आहे. अजित पवारांना भेटून त्या धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करणार आहेत. त्यामुळे अजित पवार भेटीची वेळ देणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

काय म्हटले आहे दमानियांनी?

दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा 36 चा आकडा आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन.

बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थारा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना?, असे दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.  

वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत, हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे. बघू कधी वेळ देतात, असेही दमानिया यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT