Shivsena UBT News : उद्धव सेनेच्या 'त्या' नगरसेवकांचा शिंदे गटातील प्रवेश लांबला!

Chhatrapati Sambhajinagar Political Updates : महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. उच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालानंतरच महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे तूर्तास घाई नको, अशी भूमिका उद्धवसेनेच्या त्या माजी नगरसेवकांनी घेतल्याचे बोलले जाते.
Shivsena UBT
Shivsena UBT Sarkarnama
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : गेल्या महिनाभरापासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला छत्रपती संभाजीनगर मध्ये गळती लागली आहे. माजी महापौर आणि शहरातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सत्ताधारी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ताकद शहर आणि जिल्ह्यामध्ये कमी होताना दिसत आहे.

अशातच आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव सेनेचे दहा ते बारा माजी नगरसेवक (Shivsena) शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या दोन आठवड्यापासून सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांनी हे सर्व माजी नगरसेवक जालना येथे 25 तारखेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले होते.

परंतु हा प्रवेश काही झाला नाही त्यानंतर हे माजी नगरसेवक पक्ष सोडणार की उद्धव ठाकरे (Uddhav Thackeary) यांच्या सोबतच थांबणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळ सुरू होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे सगळे माजी नगरसेवक शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मात्र त्यांच्यासाठी संभाजीनगर किंवा मुंबईमध्ये स्वतंत्र प्रवेश सोहळा आयोजित केला जाणार आहे.

Shivsena UBT
Sanjay Shirsat : भुमरे घटनाबाह्य पालकमंत्री होते, शिरसाट अन् मी एकाच पक्षात काम केले; खैरेंची पालकमंत्री शिरसाट यांच्याशी हातमिळवणी!

महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. उच्च न्यायालयातील याचिकेच्या निकालानंतरच महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. त्यामुळे तूर्तास घाई नको, अशी भूमिका उद्धवसेनेच्या त्या माजी नगरसेवकांनी घेतल्याचे बोलले जाते. दुसरीकडे हात जोडून विनंती केल्यानंतरही हे माजी नगरसेवक आणि पदाधिकारी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी त्यांना रोखण्याचे प्रयत्न आता पूर्णपणे थांबवल्याचे दिसते.

Shivsena UBT
CM Fadnvis-Chandrakant Khaire News : मुख्यमंत्री फडणवीस-खैरे भेटीतील 'त्या' पार्सलची जोरदार चर्चा

त्यामुळे गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेली चर्चा तूर्तास थांबली आहे. आता या माजी नगरसेवकांचा शिवसेना शिंदे गटात नेमका प्रवेश कधी होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे. वाल्मीक कराड प्रकरणानंतर महायुतीतील घटक पक्षांनी इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षात घेण्यासाठी काही आचारसंहिता ठरवली आहे. त्यानुसार घटक पक्षातील कोणत्याही पक्षांमध्ये कुणाचा प्रवेश करून घ्यायचा असेल तर त्यासाठी महायुतीच्या तीनही पक्षांच्या नेत्यांची संमती मिळवावी लागणार आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या भरमसाठ प्रवेशांना आता काही प्रमाणात ब्रेक लागला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com