RSS Against Smart Meters : संघ देणार स्मार्ट मीटरवरून महायुतीला शॉक !

Maharashtra Smart Meter Protest : महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात महायुतीच्या जवळपास सर्व आमदार आणि मंत्र्यांनी स्मृतिमंदिराला भेट दिली होती.
RSS Against Smart Meters
RSS Against Smart MetersSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : भाजप महायुती सरकारच्या स्मार्ट विद्युत मीटरला आता संघाच्यावतीने विरोध केला जात आहे. राष्ट्रीय स्वंयसंघ प्रणित भारतीय मजदूर संघाच्यावतीने या विरोधात बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत भाजप महायुतीच्या विजयात संघाचेही मोठे योगदान होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह अनेकांनी निवडणुकीच्या निकालानंतर संघाचे आभार मानले आहे. शरद पवार यांनीसुद्धा संघाच्या कार्यामुळे महायुतीला मोठे मतदान झाल्याचे मान्य केले आहे. आता संघाच्या कामगार संघटनेच्यावतीने महायुतीच्या निर्णयाला विरोध दर्शवला जात आहे. महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर हिवाळी अधिवेशनात महायुतीच्या जवळपास सर्व आमदार आणि मंत्र्यांनी स्मृतिमंदिराला भेट दिली होती.

RSS Against Smart Meters
Vasant Purke : माजी मंत्री पुरकेंनी टोचले काँग्रेस नेत्यांचे कान; ‘अजूनही काहींना सत्तेत असल्यासारखं वाटतंय’

अलीकडे संघाने बोलावलेल्या बैठकीतही आमदार सहभागी झाले होते. भाजप मंत्र्यांकडे एक ओएसडी नेमल्या जाणार आहे. तो संघाचा प्रतिनिधी म्हणून काम करणार असल्याची चर्चा आहे. महायुती सरकार आणि सरकारच्या योजनांना शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्यासाठी ओएसडी काम करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘पथ अंत्योदय' हे संघाचे धोरण आहे. या सर्व पार्श्वभूमीवर स्मार्ट मीटरला विरोध केला जात असल्याने सरकारला याची दखल घ्यावी लागणार असल्याचे बोलले जात आहे.

उद्योगपती अदानी (Adani) यांना विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. महाविकास आघाडी आणि विरोधकांच्यावतीने आधीपासूनच यास विरोध केला जात आहे. विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी विद्युत मीटर लावण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र महायुतीचे सरकार स्थापन होताच पुन्हा विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास सुरुवात झाली आहे. भामसंच्या एम.एस.ई.डी. सी.एल. कंत्राटी विद्युत मिटर रीडर संघाच्यावतीने या विरोधात विधान भवनावर मोर्चा काढण्यात आला होता.

RSS Against Smart Meters
Congress on Election Commission : ''निवडणूक आयोग जिवंत आहे का, जर असेल तर...'' ; काँग्रेसचे पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र!

मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री तसेच मुख्य अभियंतांना निवेदन देऊन यावर चर्चा करण्याठी बैठक बोलावण्याची मागणी केली होती. मात्र याची अद्याप दखल घेण्यात आलेली नाही. आता संघटनेने सरकारला अल्टीमेटमच दिला आहे. ३१ जानेवारीपूर्वी संघटनेसोबत चर्चा झाली नाही तर एक फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे. मागील २० वर्षांच्या कालावधीत कधी कामावर परिणाम होऊ दिला नाही. पर्यंत संघटनेसोबत चर्चा झाली नाही तर नाईलाजास्तव बेमुदत काम बंद आंदोलन करावे लागणार असाही इशारा देण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com