Anil Parab-Eknath Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

Satara ZP controversy: अनिल परबांच्या 'टोलेबाजी'ने शिंदे सेना घायाळ! आता हे वाघ कुठे गेले, मार खात आहेत; सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी

Political News : सत्ताधारी-विरोधकांमध्ये विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी पाहवयास मिळाली. ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचले.

सरकारनामा ब्युरो

Mumbai News : सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या सर्व गोंधळाचे पडसाद सोमवारी थेट राज्याच्या विधान परिषदेत उमटले. सोमवारी सकाळी विधानपरिषदेचे कामकाज सुरु होताच सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांनीच कैफियत मांडली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते. त्यातच विधान परिषदेत पोलिसांच्या अरेरावीचा मुद्दा उपस्थित करत मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांनी थेट पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह इतर शंभर पोलिसांचे निलंबन करण्याची मागणी केली. उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पोलीस अधीक्षक दोषी यांचे निलंबन केले. त्यानंतरही सत्ताधारी-विरोधकांमध्ये विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी पाहवयास मिळाली. आता हे वाघ कुठे गेले मार खात आहेत, असा सवाल उपस्थित करीत ठाकरे सेनेचे आमदार अनिल परब यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचले.

विधानपरिषदेत सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी झालेल्या सर्व गोंधळावरून एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांची शिवसेना, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आक्रमक झाले होते. सभागृहातच सेनेचे मंत्री शंभूराज देसाई व मकरंद पाटील यांनी सातारा झेडपीमध्ये झालेल्या गोंधळाची माहिती त्यांनी दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सेनेचे आमदार अनिल परब यांनी संधी मिळताच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला डिवचले.

सातारा झेडपीप्रकरणावरून अनिल परबांनी (Anil Parab) शिंदेच्या शिवसेनेला टोले लगावले, आता हे वाघ कुठे गेले मार खात आहेत. मंत्र्यांना मार खावा लागत असेल तर ही लाजिरवाणा प्रकार आहे. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेतून बाहेर पाडण्याचे धाडस दाखवावे असे आव्हान परब यांनी सभागृहात दिले.

परब यांनी केलेल्या हल्ल्यानंतर घायाळ झालेल्या शिंदे सेनेनी परब यांना त्यांच्या भाषेत सुनावले. यावेळी उद्योग मंत्री परब म्हणाले, 'शेपटी घालण्याच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, आम्ही न्याय मागत आहोत. त्यामुळे सरकारने आम्हाला न्याय द्यायला हवा अशी मागणी उदय सामंत यांनी केली.

सातारा झेडपी अध्यक्ष निवडीवेळी आम्हाला कोथळे बाहेर काढण्याच्या धमक्या दिल्या. त्यामुळे आम्ही हतबल आहेत, असे समजू नका. विनाकारण आम्हला डिवचयाचे काम करू नका. महायुतीमध्ये आम्हाला काही कटू अनुभव आले आहेत. तुम्ही तर भाजपचे नवा घेण्यास सुद्धा घाबरता, असे मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हणत ठाकरे सेनेला सुनावले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT