Satej Patil amit Deshmukh  sarkarnama
महाराष्ट्र

Congress Politics : राहुल गांधींचा महाराष्ट्र काँग्रेसला 'दे धक्का', प्रदेशाध्यक्षपदासाठी सतेज पाटील, अमित देशमुखानंतर 'हे' नाव चर्चेत, ओबीसी-मराठा वादावर काढले उत्तर?

Harshvardhan Sapkal in Race for Maharashtra Congress State President : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा शर्यतीमध्ये सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत. मराठा समाजातून या नावांना अधिक पाठींब्या मिळण्याची शक्यता आहे.

Roshan More

Congress Politics : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. काँग्रेसचे अवघे 16 आमदार विजयी झाले आहेत. या पराभवाची जबाबदारी स्वीकारत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. पटोले यांचा राजीनामा स्वीकारला नसला तरी नवीन प्रदेशाध्यक्षाचा शोध काँग्रेसकडून सुरू करण्यात आला आहे.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा शर्यतीमध्ये सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर आहेत. मराठा समाजातून या नावांना अधिक पाठींब्या मिळण्याची शक्यता आहे. ओबीसी नेते म्हणून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर यांच्या नावाची देखील प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चे होती. त्यामुळे यातील कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता होती.

प्रदेशाध्य पदासाठी सतेज पाटील, विश्वजित कदम, अमित देशमुख यांची नावे आघाडीवर असतानाच हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव देखील पुढे आले आहे. या चार जणांमधूनच नवीन प्रदेशध्यक्ष निवडला जाण्याची शक्यता आहे. मात्र, हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव अचानक समोर आल्याने त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

हर्षवर्धन सपकाळ हे गांधी कुटुंबीयांच्या जवळचे मानले जातात. काँग्रेसच्या राज्य व राष्ट्रीय स्तरावरील विविध उपक्रमात ते नेहमीच सक्रिय सहभागी राहिले आहेत. राज्यस्तरावर त्यांचे नाव फारसे चर्चेत नसले तरी संघटनेमध्ये ते एकनिष्ठतेने काम करत असतात. 

हर्षवर्धन सपकाळ कोण?

हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसचे निष्ठवान नेते मानले जातात. 2014 ते 2019 या कालावधीत ते आमदार होते. बुलढाणा मतदारसंघाचे त्यांनी प्रतिनिधीत्व केले. त्यांनी बुलढाणा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहेत आणि राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहेत आणि त्यांची गांधी परिवाराशी जवळीक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT