Sharad Pawar : दिल्लीत घडामोडीना वेग, राज्यात वातावरण तापलं; शरद पवारांच्या भेटीनंतर शिंदे सेनेचे नेते म्हणतात,...'

Sharad Pawar Meeting News : दिल्लीतील या घडामोडीनंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच बुधवारी सायंकाळी दिल्लीत शरद पवार यांची शिंदे सेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मोठं विधान केले.
Sharad Pawar, Eknath Shinde
Sharad Pawar, Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Delhi Political Developments News : दिल्लीत मंगळवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे यांच्या नावाने राष्ट्र गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर बुधवारी सकाळपासूनच महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे. दिल्लीतील या घडामोडीनंतर राज्यात वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच बुधवारी सायंकाळी दिल्लीत शरद पवार यांची शिंदे सेनेचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार नरेश म्हस्के यांनी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मोठं विधान केले.

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून वेगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष या घटना घडामोडीकडे लागले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. यावरुन संजय राऊतांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे दोन मोठे नेते बुधवारी सायंकाळी ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी दाखल झाले. त्यामुळे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. या दोन नेत्यांनी भेट घेतल्याने पुन्हा एकदा चर्चेला उधाण आले आहे.

Sharad Pawar, Eknath Shinde
Rishiraj Sawant : ...तर बँकॉककडे जाणारे विमान माघारी फिरवणे अवघड गेले असते; पोलिसांनी दिली धक्कादायक अपडेट

शरद पवार हे सध्या दिल्लीतच असून त्यांच्या दिल्लीतील निवासस्थान असलेल्या 6 जनपथ रोडवर सध्या महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. त्यातच शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे नेते उदय सामंत, नरेश म्हस्के हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले होते. या भेटीनंतर सामंत म्हणाले, मी राज्याच्या मराठी भाषेचा मंत्री आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्याचे स्वागत अध्यक्ष शरद पवार आहेत. मी मराठी भाषेचा मंत्री असल्याने आढावा घेण्यासाठी इथे आलो होतो, असे त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Eknath Shinde
Shivsena UBT : 'तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा', ठाकरेंचे शिलेदार पोहोचले पोलिस ठाण्यात

शरद पवार यांची भेट झाली म्हटल्यानंतर चर्चा तर होणारच. साहित्य संमेलनाची चर्चा झाली. पण तुम्ही एवढं काही चालवत आहात, त्यामुळे चर्चा तर होणारच ना. पण जी काही चर्चा झाली, ती चर्चा मी, म्हस्के आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू. त्यानंतर तुम्हाला सांगू. आमचे नेते शिंदे आहेत, असे सूचक विधान उदय सामंत यांनी केले.

Sharad Pawar, Eknath Shinde
Shivsena UBT : 'तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करा', ठाकरेंचे शिलेदार पोहोचले पोलिस ठाण्यात

या ठिकाणी स्वागताध्यक्ष म्हणून शरद पवार यांना भेटणं हे क्रमप्राप्त आहे. त्यामुळेच आम्ही त्यांची भेट घेतली. या भेटीत संमेलनाबद्दल चर्चा झाल्या. यावेळी कुठल्याही राजकीय घडामोडी या ठिकाणी झाल्या नाहीत. असे या भेटीनंतर उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Eknath Shinde
Eknath Shinde : एकनाथ शिंदे भाजपला धक्का देण्याच्या तयारीत; 'तो' प्लॅन पुन्हा सक्रिय करणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com