Tarpa Artist Palghar : भारतीय आदिवासी संस्कृतीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या पारंपरिक तारपा वादन कलेचे जतन अन् संवर्धनासाठी आयुष्यभर योगदान देणाऱ्या भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारने पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित केलं. हा सन्मान केवळ एका कलाकाराचा नसून संपूर्ण वारली आदिवासी संस्कृतीचा गौरव मानला गेला.
मात्र इतक्या मोठ्या राष्ट्रीय सन्मानानंतरही या ज्येष्ठ कलावंतांची सध्याची आर्थिक स्थिती अत्यंत दयनीय आहे. भिकल्या धिंडा यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह आज केवळ एका एकर भातशेतीवर कसाबसा चालतो. आर्थिक अडचणींमुळे त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याकडे नाशिक पदवीधरचे आमदार सत्यजीत तांबे यांनी थेट सभागृहातून सरकारचे लक्ष वेधले.
पालघर जिल्ह्यातील वाळवंडा (ता. जव्हार) गावचे आदिवासी वारली समाजाचे ज्येष्ठ तारपा वादक अन् पद्मश्री पुरस्कार विजेते भिकल्या लाडक्या धिंडा यांची आर्थिक परिस्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. सरकारने (Government) याकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने मदत करावी, अशी मागणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली.
सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी सरकारचे लक्ष वेधताना, आदिवासी संस्कृतीचा अमूल्य वारसा जपणाऱ्या कलावंतांना समाजात सन्मानपूर्वक जीवन जगता आले पाहिजे. यासाठी सरकारने विशेष मदत योजना राबवावी. भिकल्या धिंडा यांना आर्थिक मदतीबरोबर चांगले निवासस्थान द्यावे. कला जपण्यासाठी, संवर्धनासाठी त्यांना चांगले वातावरण निर्माण करून द्यावे, अशी मागणी केली.
'पद्मश्री सारखा सर्वोच्च नागरी सन्मान मिळालेल्या कलाकाराची, आर्थिक कारणावरून, अशी परिस्थिती होणे हे खेदजनकच आहे. राज्यातील महायुती सरकारने कलावंत भिकल्या धिंडा यांना आर्थिक मदत करावीच. तसेच त्यांच्यासारख्या अन्य कलाकारांना समाजाता सन्मानाने राहता यावे, यासाठी ठोस योजना राबवावी,' असेही सत्यजीत तांबे यांनी म्हटले.
भिकल्या धिंडा यांना केंद्र सरकारने 2026मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध तारपावादक भिकल्या धिंडा हे अत्यंत हलाखीच्या आर्थिक परिस्थितीत जीवन जगत आहेत. 92 वर्षीय भिकल्या धिंडा यांचे घर पडक्या अवस्थेत असून, कुटुंबाचा उदरनिर्वाह फक्त एक एकर आठ गुंठे जमिनीवर अवलंबून आहे. त्यांच्याकडे उत्पन्नाचे कोणतेही ठोस साधन किंवा नोकरी नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.