Ramdas Athawale : 'शिर्डी नाही मिळाली, पण देशभर लढणार!' आठवले आता 'RPI'ला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी देशभर दौऱ्यावर

Union Minister Ramdas Athawale announced that he will tour across India to secure national party recognition for the Republican Party of India after offering prayers at the Sai Samadhi in Shirdi : केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी इथं साई समाधीचं सपत्नीक दर्शन घेत, माध्यमांशी संवाद साधला.
Ramdas Athawale
Ramdas AthawaleSarkarnama
Published on
Updated on

Ramdas Athawale Political Tour : "शिर्डीचा खासदार व्हायची इच्छा पूर्ण झाली नाही. मात्र तीन वेळा लोकसभेत आणि तीन वेळा राज्यसभेत जाणारा मी एकमेव रिपब्लिकन नेता आहे.

तिसऱ्यांदा राज्यसभेवर जाण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळावी, यासाठी मी देशभर फिरणार आहे. देशातील पाचवा राष्ट्रीय पक्ष म्हणून माझा पक्ष ओळखला जावा, हे माझे ध्येय आहे," असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले.

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिर्डी (Shirdi) इथं येत साई समाधीचे सपत्नीक दर्शन घेतलं. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळावी, यासाठी मी देशभर फिरणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

रामदास आठवले (Ramdas Athawale) म्हणाले, "मला माझा पक्ष देशभर वाढवायचा आहे. 28 राज्य आणि 8 केंद्र शासीत प्रदेशांत माझ्या पक्षाचे अस्तित्व आहे. नागालॅण्डमध्ये आमचे दोन आमदार आहेत. भाजपने मला त्यांच्या कोट्यातून आजवर राज्यसभेत पाठविले. यावेळी तर मी त्यांच्या सहकार्याने आरपीआयचा खासदार म्हणून बिनविरोध राज्यसभेवर जाणार आहे."

Ramdas Athawale
Madhi Kanifnath Yatra : मढी यात्रेत लागली मुस्लिमांची दुकाने? ‘देवस्थानच्या विश्वस्तांचे 'ते' नातेवाईक’ म्हणत संजय मरकड यांचा तिळपापड!

दलित पँथरच्या माध्यमातून मी दलितांवरील अत्याचाराला वाचा फोडली. त्याचबरोबर भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीप्रमाणे सर्वांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका घेतल्याचे मंत्री आठवले यांनी सांगितले.

Ramdas Athawale
Helicopter Emergency Landing : हवेतच तांत्रिक बिघाड! उत्तराखंडच्या राज्यपालांच्या हेलिकॉप्टरची आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

भाजप सर्व जाती-जमातींना प्राधान्य

भाजप सर्व जाती-जमातींना प्राधान्य देणारा पक्ष आहे. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हे त्याचे उदाहरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका साथ, सबका विकास’ हे धोरण आहे. विविध देशांशी त्यांचे चांगले संबंध आहेत. साई मंदिर विभागप्रमुख विष्णुपंत थोरात आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लोखंडे यांनी त्यांचे स्वागत केले.

अजित पवार यांच्या अपघाताची सखोल चौकशी गरजेची

अजित पवार यांच्या विमान अपघातसंदर्भात बोलताना आठवले यांनी, प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या आरोपांबाबत सावध भूमिका मांडली. एखाद्या कार्यक्रमाला किंवा लग्नसमारंभाला उपस्थित राहिल्यामुळे कोणावरही थेट आरोप करणे योग्य नाही. मात्र संबंधित विमान कंपनी, उड्डाणाची परवानगी आणि तांत्रिक बाबींची सखोल चौकशी झालीच पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.

पटेलांचे ‘व्हीएसआर’च्या मालकांशी संबंध

प्रफुल पटेल नागरी उड्डाण मंत्री होते. त्यामुळे ‘व्हीएसआर’च्या मालकांशी त्यांचे चांगले संबंध असतील. मात्र अजित पवारांच्या मृत्यूची चौकशी झाली पाहिजे. अजित पवारांचा घातपात झाला असे मला वाटत नाही. कारण अजित पवार हे सर्व पक्षांमध्ये मित्रत्वाचे संबंध ठेवणारे नेते होते. मात्र ही घटना अत्यंत दुर्दैवी असून नेमके कारण समोर यावे यासाठी निष्पक्ष चौकशी होणे अत्यंत गरजेचे आहे, असेही आठवले यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com