Uber Driver Murder : 'उबेर'चा ड्रायव्हरच निघाला लुटारू! इंजिनिअरिंग विद्यार्थ्याला टार्गेट; पुढे घडलं थरारक...

Uber driver murders engineering student: लुटीला विरोध करताना, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याकडून उबेर कार चालकाचा खून झाल्याचा गुंता समोर आला आहे.
Uber driver robbery and murder case
Uber driver robbery and murder caseSarkarnama
Published on
Updated on

Uber driver crime news viral: 'उबेर' कारने पुण्याला निघालेल्या इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला कार चालक लुटण्याच्या तयारी होता. यातून दोघांमध्ये कारनेमध्ये झटापट झाली. क्षणात काही वेळातच कारचा आतला भाग रक्ताने भरून गेला.

यात कार चालक नासीर अन्सारी याचा मृत्यू झाला. इंजिनिअरींगचा विद्यार्थी आदर्श भालेराव याला या खून प्रकरणात ठाणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली. या दोघांमधील लुटीचा अन् पुढे खुनापर्यंत गेलेला थरारक घटनाक्रम समोर आला आहे.

कल्याण टिटवाळ्यात रक्ताच्या दागाने माखलेली उबेर कार सापडली. या कारचा चालक बेपत्ता होता. अखेर चालकाचा मृतदेह ओतूर पोलिस (Police) ठाण्याच्या हद्दीत सापडला. या प्रकरणात अतिशय धक्कादायक माहिती समोर आली. इंजिनिअरिंगचा विद्यार्थी आदर्श भालेरावकडून उबेरचा कार चालक नासीर अन्सारी याचा खून झाला होता.

पुण्याला (Pune) जाण्यासाठी आदर्श याने उबेर कार घेतली होती. तो त्याच्या मैत्रिणीला भेटायला चालला होता. कारने प्रवास सुरू होताच, चालक नासीर अन्सारी याने कार, आदर्शला लुटीच्या उद्देशाने गणेश खिंड परिसरात नेत थांबविली. तिथं नासीर अन्सारी याने चाकू काढत आदर्श याला घाबरले. त्याच्याकडील पैशाची मागणी केली.

Uber driver robbery and murder case
Ramdas Athawale : 'शिर्डी नाही मिळाली, पण देशभर लढणार!' आठवले आता 'RPI'ला राष्ट्रीय मान्यता मिळवण्यासाठी देशभर दौऱ्यावर

या दोघांमध्ये यावरून वाद झाला. नासीर अन् आदर्श यांच्यात कारमध्येच झटापट सुरू झाली. यातून आदर्शन प्रतिकार करताना, नासीरच्या हातातील चाकू हिसकावून घेतला. बचावत्मक प्रयत्नात असतानाच, आदर्शच्या हातातील चाकून चालक नासीर याच्या गळ्यावर वार केला. हा वार वर्मी लागल्याने नासीरचा मृत्यू झाला.

Uber driver robbery and murder case
Madhi Kanifnath Yatra : मढी यात्रेत लागली मुस्लिमांची दुकाने? ‘देवस्थानच्या विश्वस्तांचे 'ते' नातेवाईक’ म्हणत संजय मरकड यांचा तिळपापड!

नासीरचा मृतदेह तिथेच टाकून आदर्शने उबेरची कार टिटवाळ्याला आणली. गाडी टिटवाळा गोवेली रस्त्यावर कार सोडून पळून गेला. कार बराच वेळ उभी अन् रक्ताने भरलेली असल्याचे लक्षात आल्यावर पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी शोध घेत घटनाक्रम उलगडा केला. यानंतर नासीरच्या खूनमागील थरारक नाट्य समोर आलं.

नासीरला पैशाची गरज होती. त्याने चार ते पाच जणांकडे पैसे मागितले होते. आदर्शचा हेतू नासीरची हत्या करण्याचा नव्हता. मात्र हा गुन्हा घडला. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहे. या प्रकरणी ओतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com