Court proceedings bring renewed attention to historical debate surrounding Vinayak Damodar Savarkar after testimony by Satyaki Savarkar. sarkarnama
महाराष्ट्र

Soniya Gandhi: ...तर सोनिया गांधींनाही कोर्टात खेचल्याशिवाय राहणार नाही; सावरकरांच्या नातवाची राजकीय वादात उडी

Congress Politics: देशभरात सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या 'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह'या पुस्तकाची जोरदार चर्चा आहे. मात्र, याच पुस्तकामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरश:ढवळून निघालं आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News: देशभरात सध्या काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्या'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह'या पुस्तकाची जोरदार चर्चा आहे.मात्र,याच पुस्तकामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अक्षरश:ढवळून निघालं आहे. सोनिया गांधी यांच्या'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवरून नवा राजकीय वाद पेटला आहे.एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पुस्तकातील मजकुरावर आक्षेप घेत निषेध व्यक्त केला.आता या वादात सावरकरांच्या नातवानं उडी घेतली आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी 'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह' या पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. यामुळे नवा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

सात्यकी सावरकर यांनी 'बिलॉन्गिंग अ जर्नी ऑफ लव्ह'पुस्तकाबाबत मोठं विधान केलं आहे. ते म्हणाले, सोनिया गांधी यांच्या पुस्तकात सावरकरांविषयी काही उल्लेख असल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे. मात्र,अद्याप आपण हे पुस्तक वाचलेले नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे वाचन करणार असून जर त्यात सावरकरांविषयी काही चुकीचे किंवा तथ्यहीन आरोप आढळल्यास कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेणार आहे. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याविरोधात कायदेशीर लढाई सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

तसेच यावेळी सात्यकी सावरकर यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही सावरकरांबद्दल कोणताही ठोस आधार किंवा संदर्भ नसलेली वक्तव्ये केल्याचा दाखला दिला आहे. त्यांनी आपण राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीचा खटला दाखल केल्याचंही सांगितलं. त्या प्रकरणी न्यायालयाने गांधी यांना दणका दिल्याचंही त्यांनी सावरकर यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांच्या पुस्तकाचे वाचन करणार असून त्यामध्ये सावरकरांविषयी चुकीचे किंवा तथ्यहीन आरोप आढळल्यास कायदेशीर तज्ज्ञांचा सल्ला घेण्यात येईल. त्यानंतर सोनिया गांधी यांच्याविरोधातही न्यायालयीन लढाई सुरू करण्यास मागेपुढे पाहणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शायना एनसी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडल्याचा आरोप झाल्यानं उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पेटून उठली आहे. सोबत काँग्रेसनंही आक्रमक भूमिका घेत शायना एनसी सह शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. राज्यातील विविध ठिकाणी शायना एनसी यांच्याविरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT