Tomb of Aurangzeb News Sarkarnama
महाराष्ट्र

Aurangzeb News : औरंगजेबच्या कबरीला एसआरपीच्या तुकडीकडून सुरक्षेचा वेढा!

Security measures have been increased around Aurangzeb's grave with SRP squad deployed for safety and protection. : एकूणच हिंदुत्ववादी संघटनांकडून होणारी मागणी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून औरंगजेबची कबर उखडून टाका, यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा पाहता पोलीस सतर्क झाले आहेत.

Jagdish Pansare

Maharashtra Political News : महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट प्रदर्शित झाला. क्रूर औरंगजेबाने संभाजी महाराजांचे केलेले हाल प्रत्यक्ष पडद्यावर पाहतांना अनेकांच्या डोळ्यातील अश्रूंचा बांध फुटला. अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच आपल्या धर्माभिमानी राज्याचे झालेले हाल पहावले नाही. दरम्यान, छत्रपती संभाजी महाराज यांचा छळ करणाऱ्या औरंगजेबची कबर उखडून टाका, अशी मागणी केली जाऊ लागली.

विशेषत: राजकीय क्षेत्रातून या मागणीवर अधिक भर दिला जात आहे. (BJP) भाजपाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी या संदर्भात पहिल्यांदा मागणी केली. त्यानंतर काही हिंदुत्ववादी संघटनांनीही औरंगजेबची कबर काढा, यासाठी आक्रमक पावित्रा घेतल्याचे पहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या विषयावर आपली भूमिका स्पष्ट केली.

औरंगजेबाच्या कबरीला जुन्या काँग्रेसच्या काळात एएसआयचं संरक्षण मिळालं. उदयनराजे भोसले यांना वाटतं तसंच आम्हालाही प्रत्येकाला असंच वाटतं. फक्त काही गोष्टी कायद्याने कराव्या लागतात, औरंगजेबाच्या कबरीला कायदेशीर संरक्षण आहे. आता कबरीला देण्यात आलेले हे विशेष संरक्षण कायद्याचं पालन करून हटवणं अथवा बदलवणं आवश्यक आहे. या प्रकरणात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही, असे फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. तर आमदार नितेश राणे यांनी ही कबर किती दिवस राहिल हे पाहा, असा सूचक इशारा दिला होता.

एकूणच हिंदुत्ववादी संघटनांकडून होणारी मागणी, बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून औरंगजेबची कबर उखडून टाका, यासाठी रस्त्यावर उतरण्याची भाषा पाहता पोलीस सतर्क झाले आहेत. खुलताबद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीली एसआरपीत्या तुकडीने सुरक्षेसाठी वेढा घातला आहे. इथे येणाऱ्या प्रत्येकाची कसून तपासणी केली जात आहे. औरंगजेबच्या कबर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

या ठिकाणी दोन पोलीस अधिकारी आणि 15 कर्मचारी तैनात करण्यात आले असून संबंधित अधिकाऱ्यांनी आज कबर परिसरात व आतमध्ये जाऊन पाहणी केली. कबर परिसरातील दोन ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच दोन ठिकाणी फिक्स पॉइंट लावण्यात आले आहेत. शेवटचा मुघल सम्राट औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजीनगरपासून चोवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या खुलताबाद येथे आहे.

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवसी औरंगजेब हा उत्तम शासक होता, असे विधान केले होते. यावरून सभागृहात आणि बाहेरही मोठा गदारोळ झाला. विधीमंडळात विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही बाजूंनी अबू आझमी यांच्या कारवाईची मागणी झाली आणि अखेर आमझी यांना संपूर्ण अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आले. त्यानंतर औरंगजेबचा विषय अधिकच चिघळला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT