Sharad Koli Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Koli Arrest : मोठी बातमी! उद्धव ठाकरेंच्या पक्षातील बड्या नेत्याला अटक, थेट येरवडा तुरुंगात रवानगी

MPDA Act Shiv Sena UBT : शरद कोळी यांच्यावर MPDA म्हणजे महाराष्ट्र धोकादायक कृत्ये प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

Roshan More

Sharad Koli News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांना पोलिसांनी सांगलीतून अटक केली आहे. त्यांच्यावर MPDA अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. ते फरार होते. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक करत त्यांची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे. वर्षभर तेथे त्यांना स्थानबद्ध ठेवण्यात येणार आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईचे आदेश जारी झाल्यापासून कोळी फरार होते. मात्र, काल त्यांना सांगलीतून अटक करण्यात आली. गंभीर स्वरुपाचे तब्बल 9 गुन्हे त्यांच्यावर दाखल आहेत. त्यामध्ये धमकी, खंडणी, मारहाण सारख्या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे.

एमपीडीए अन्वये कारवाई म्हणाजे

MPDA म्हणजे महाराष्ट्र धोकादायक कृत्ये प्रतिबंधक कायदा त्यानुसार कोळी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कायद्यात सराईत गुन्हेगाराला किंवा समाजासाठी घातक ठरणाऱ्या व्यक्तीला विना-जमीन थेट तुरुंगात स्थानबद्ध करता येते. या कायद्याचा मुख्य उद्देश समाजात शांतता प्रस्थापित करणे आहे. दरम्यान, या कायद्याचा दुरउपयोग विरोधकांना दाबण्यासाठी सत्ताधारी करत असल्याचा आरोप देखील करण्यात येतो. या कायद्यानुसार आरोपीला एका वर्षासाठी स्थानबद्ध केले जाते. त्याला जामीनासाठी अर्ज देखील करता येत नाही.

शरद कोळींचा राजकीय प्रवास

शरद कोळी हे आक्रमक नेते म्हणू ओळखले जातात. ते मुळचे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील आहेत. त्यांनी 'धाडस' नावाची सामाजिक संघटना स्थापन करत सोलापूरच्या विविध भागात संघटनात्मक काम केल्याचा त्यांचा दावा आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी 2022 मध्ये ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांच्याकडे युवासेनेच्या विस्ताराची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी युवासेनेचे विविध कार्यक्रमक घेतले होते. पक्षाने त्यांच्या उपनेते म्हणून जबाबदारी टाकली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT