Sharad Lad : भाजपचे धक्कातंत्र; उमेदवारी नाकारलेल्या शरद लाडांनी मनातलं बोलून दाखवलं, थेट पत्रक काढत स्पष्ट केली भूमिका

Pune Graduate Election : शरद लाड यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मंत्री चंद्रकात पाटील यांनी पुणे पदवीधरमधून लाड यांना उमेदवारी देणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे लाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 Sharad Lad
SarkarnamaBJP candidate Smita Jadhav has been nominated for the Pune Graduate Constituency election, while Sharad Lad has backed the party's decision.
Published on: 
Updated on: 

Pune Graduate Election : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी जाहीर केली. ही उमेदवारी शरद लाड यांच्यासाठी मोठा धक्का मानली जात आहे. कारण शरद लाड यांनी मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा मंत्री चंद्रकात पाटील यांनी पुणे पदवीधरमधून लाड यांना उमेदवारी देणार असल्याचं जाहीर केलं होतं.

मात्र, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपने डॉ. स्मिता जाधव यांना उमेदवारी दिल्यामुळे लाड यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात होता. अशातच, आता खुद्द शरद लाड यांनी पक्षाच्या निर्णयावर आपली कोणतीही नाराजी नसल्याचं म्हटलं आहे.

शरद लाड यांनी फेसबुकवर एक पत्रक शेअर करत आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिलं की, "पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून डॉ. स्मिता योगेश जाधव यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून पुणे विभागातील पदवीधर मतदारांची नोंदणी करण्याचे काम आम्ही करत होतो.

 Sharad Lad
Gyanesh Kumar : ज्ञानेश कुमारांना पहिला सर्वात मोठा झटका; इंजिनिअरची आत्महत्या भोवणार, गृहमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश

पक्षाने पक्षहिताच्या दृष्टीने हा निर्णय घेत असताना मला पूर्णपणे विश्वासात घेतले असून, मी या निर्णयाचे स्वागत करतो," असं म्हटलं आहे. तसंच या निवडणुकीत मी आणि माझे सर्व सहकारी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी ठामपणे उभे राहू आणि त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करू. पक्षाच्या या निर्णयाबाबत माझी कोणतीही नाराजी नाही, असं म्हटलं आहे.

शिवाय पक्षासाठी मी आजवर दिलेल्या योगदानाचा आणि केलेल्या कार्याचा विचार भविष्यात पक्षश्रेष्ठींकडून नक्कीच केला जाईल, याची मला पूर्ण खात्री आहे. पक्षाचा निर्णय हा अंतिम असून, पक्षहिताला सर्वोच्च प्राधान्य देत आपण सर्वजण एकजुटीने काम करू," असं म्हणत लाड यांनी उमेदवारी डावलल्यानंतर ते बंडखोरी करणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

 Sharad Lad
Bank Election : उदय सामंतांनी दंड थोपटलेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप मतदार यादी तयार, प्रक्रिया सुरू

दरम्यान, पुणे पदवीधरसाठी भाजपकडून डॉ. स्मिता जाधव यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून हर्षदा देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली असून या दोन उमेदवारांमध्ये पुणे पदवीधरमध्ये प्रमुख लढत होणार आहे. तसंच पुणे शिक्षक मतदारसंघातून भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com