Sharad Pawar News Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; कांद्यावरची निर्यात बंदी उठविण्यासाठी आग्रही

Sachin Waghmare

Political News : केंद्र सरकारने कांद्यावर निर्यात बंदी घातल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने राज्यभर आंदोलने केली जात आहेत. त्याशिवाय नुकत्याच झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकरी आंदोलनात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (Ncp) सर्वेसर्वा शरद पवार हे देखील रस्त्यावर उतरले आहेत. शरद पवार यांनी नाशिकमधील चांदवड येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होत आंदोलकांना पाठिंबा देत केंद्र सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली.

केंद्र सरकारने कांद्यावरची निर्यात बंदी उठवली पाहिजे. सरकारच्या घसरत्या धोरणांचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. केंद्र सरकारने वारंवार धोरण बदलणे योग्य नाही. त्याचा परिणाम आंतरराष्ट्रीय बाजारपेठत होत आहे. अतिवृष्टीची व गरिपीटचा फटका राज्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कांद्यावरची निर्यात बंदी उठवत राज्य, केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली.

नाशिक येथे आंदोलनानंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेत प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली. कांदा निर्यातीमुळे काहीसे उत्पन्न शेतकऱ्याला मिळते. शेतकऱ्याच्या कष्टाला किंमत मिळत नसल्याने अडचणीत वाढ झाली आहे. कांदा निर्यातीत सरकारचा हस्तक्षेप नसावा, अशा व्यथा राज्यातील शेतकऱ्यांनी माझ्याकडे मांडल्या आहेत. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी उद्या दिल्लीला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावून १० दिवसांपेक्षा अधिक कालावधी लोटला आहे. अद्याप या शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नाहीत. मदत कधी मिळणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. मदत करू म्हणून घोषणा करतात मात्र अद्याप पंचनामे झाले नाहीत. येत्या काळात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाल्यास आंदोलनची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुंबईतील बंदरात निर्यातीअभावी कांदे पडून

गेल्या काही दिवसापासून मुंबईतील बंदरात निर्यातीअभावी कांदे पडून आहेत. त्यातच कृषी मंत्री आम्हाला सोडून गायब झाले आहेत. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारमधील सत्ताधारी मंडळीनी एकत्र येऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

(Edited by Sachin Waghmare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT