Vijay Wadettiwar
Vijay WadettiwarSarkarnama

Vijay Wadettiwar: पीकविमा कंपन्यांचा हप्ता कुणाला जातो ? वडेट्टीवारांनी सरकारला घेरलं...

Maharashtra Assembly Winter Session: राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातीलअश्रू या सरकारला दिसत नाहीत, वडेट्टीवार आक्रमक
Published on

Nagpur News : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सध्या सुरु असून या अधिवेशानादरम्यान विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून चांगलेच धारेवर धरले. "अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. मात्र, या सरकारचे शेतकऱ्यांकडे लक्ष नाही. राज्यातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातीलअश्रू या सरकारला दिसत नाहीत. पीकविमा शेतकऱ्यांना मिळत नाही, मग पीकविमा कंपन्यांचा हप्ता नेमकं कुणाला जातो ?", असा सवाल करत वडेट्टीवारांनी सरकारला घेरलं.

"राज्य सरकारने आधी फक्त 40 तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते. पण पाऊस कमी झाला त्यावेळीच जर सरकारने समितीची बैठक घेतली असती तर शेतकऱ्यांना फायदा झाला असता. आता राज्यातील शेतकऱ्यांचं हिवाळी अधिवेशनाकडे लक्ष आहे, आम्ही देखील दुष्काळ जाहीर करावा म्हणून सरकारकडे मागणी करत आहोत, पण सरकार दुष्काळाबाबत गंभीर नाही", असा हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vijay Wadettiwar
Sharad Pawar News : आजच्या आंदोलनाने दिल्लीची झोप उडाली असेल; कांदा निर्यातबंदीवरून पवार कडाडले

"सरकारने राज्यातील फक्त 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला होता. पण या विरोधात आम्ही आवाज उठवला, त्यानंतर सरकारला जाग आली आणि राज्यातील एक हजार 21 मंडळात दुष्काळ सदृश्य परिस्थिती सरकारने जाहीर केली. आता राज्य सरकारने शेतकऱ्यांचा एक रुपयांचा विमा उतरवला. पण या पीकविम्यामुळे कोणाचा फायदा झाला ? उलट पीकविमा कंपन्यांनाच कोट्यवधींचा फायदा झाला", असा घणाघात वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) केला.

"या पीकविमा कंपन्यांचा सरकार लाड करत आहे. या कंपन्या कुणाचंही ऐकत नाहीत. शेतकऱ्यांना फक्त तीन रुपये पीकविमा मिळतो, मग या कंपन्यांना कुणाचं संरक्षण आहे ? पीकविमा कंपन्यांचा हप्ता नेमकं कुणाला जातो ? सध्या पीकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा सुरु आहे. सरकार फक्त फोडाफोडीचं राजकारण करण्यात व्यस्त आहे, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकार गंभीर नाही", असा जोरदार हल्लाबोल वडेट्टीवारांनी केला.

(Edited by-Ganesh Thombare)

Vijay Wadettiwar
MLA Disqualification Case: 'उद्धव ठाकरेंनीच पुन्हा भाजपसोबत...'; सामंतांचा मोठा गौप्यस्फोट

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com