Ajit Pawar, Sharad Pawar, Rahul Narwekar sarkarnama
महाराष्ट्र

NCP MLA Disqualification Case : शरद पवार गटानं वाढवलं राहुल नार्वेकरांचं टेन्शन, घेतली थेट सुप्रीम कोर्टात धाव,: हे ' आहे कारण

Sharad Pawar MLA disqualified Case Rahul Narwekar : अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. या प्रकरणी 23 जुलैला मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या समोर होणार सुनावणी होणार आहे.

Roshan More

Sharad Pawar Group : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. अजित पवार यांच्या सोबत गेलेल्या आमदारांना अपात्र करा, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. या प्रकरणी 23 जुलैला मुख्य न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या समोर सुनावणी होणार आहे.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narwekar यांनी आमदार अपात्र प्रकरणात शरद पवार गट तसेच अजित पवार गटातील कोणत्याही आमदारांना अपात्र ठरवले नव्हते. मात्र, पक्षाच्या बाबातीत अजित पवार यांच्याकडे असलेला गट हा मूळ राष्ट्रवादी असल्याचा निर्णय दिला होता. विधिमंडळात असलेल्या सदस्य संख्येच्या निर्णयाच्या आधारे नार्वेकर यांना हा निकाल घेतला असल्याचे सांगितले होते.

नार्वेकर यांचा निकाल येण्याआधी निवडणूक आयोगाने देखील घड्याळ चिन्ह हे अजित पवार गटाला दिले होते. त्यामुळे नार्वेकर यांच्या निर्णयाबाबत उत्सुकता होती. मात्र, नार्वेकर यांनी विधिमंडळातील सदस्य संख्येच्या आधारे मूळ पक्ष अजित पवार Ajit Pawar यांचा असल्याचा निकाल दिला. या निकाला विरोधात शरद पवार गटाने न्यायालयात धाव घेतली होती.

'घड्याळ्या'चा निर्णय न्यायप्रविष्ट

न्यायलायने याआधीच अजित पवार गटाला सुचना केल्या आहेत की घड्याळ चिन्हाचा वापर करताना हे चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची वर्तमान पत्रातून जाहीर करावे तसेच चिन्ह वापरातना त्याखाली तशी सूचना लिहावी. मात्र, अजित पवार गटाकडून हे चिन्ह वापरताना न्यायालयाने दिलेल्या सूचना पाळली जात नसल्याचे देखील शरद पवार गटाने न्यायालयाच्या निर्देशास आणून दिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT