NCP (Sharadchandra Pawar) leader Shashikant Shinde Sarkarnama
महाराष्ट्र

NCP News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा निवडणुकांच्या तोंडावरच नवा आदेश; स्थानिक नेत्यांना मोठा फटका बसणार

Sharad Pawar NCP Politics: आगामी महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करायची का? नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी महापालिका निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करायची का? नाही यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांमध्ये दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे. या दोन मतप्रवाहांमुळे पुढील काळामध्ये पक्षांमध्ये फूट पडू शकते ही शक्यता लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

पुणे महापालिका निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन आघाडीमध्ये निवडणुका लढतील अशा चर्चा केल्या काही दिवसांपासून सुरू आहेत. मात्र या चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावर फारकत घेतली आहे.

मात्र, दुसरीकडे पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांनी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप(Prashant Jagtap) यांच्याविरुद्ध भूमिका घेत माध्यमांमध्ये बोलण्यास सुरुवात केली आहे. या दोन भूमिकांमुळे पक्षांमध्ये दोन गट पडले असल्याचे समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशांत जगताप यांनी प्रदेशाध्यक्षांनी जारी केलेल्या आदेश समोर आणले आहेत.

त्याबाबत बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा पुढील काही दिवसांत होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सर्वत्र युती व आघाड्यांच्या चर्चा वेग आला आहे. राज्यातील प्रत्येक शहर व जिल्ह्यातील कार्यकारिणीने निवडणुकीसाठी महाविकास आघाडी म्हणून लढण्यासाठी मित्रपक्षांसोबत चर्चा सुरू करावी असे आदेश प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिले आहेत.

तसेच, युती ,आघाडी यांसह निवडणुकीबद्दल माध्यमांना इतर माहिती देण्याचे अधिकार फक्त जिल्हाध्यक्षांना व शहराध्यक्षांना देण्यात आले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितला आहे. या माध्यमातून प्रशांत जगताप यांनी त्यांच्याविरुद्ध भूमिका घेणाऱ्यांना एक प्रकारे इशारा दिला असल्याचं सांगितलं जात आहे.

काय आहे शशिकांत शिंदे यांचा आदेश ?

नगरपरिषदा व नगरपंचायती निवडणुकीत आपल्याकडे अत्यंत तुटपुंजी साधने असतानाही पक्षाच्या तमाम कार्यकर्त्यांनी अत्यंत चिवटपणे झुंज देऊन आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी लाखमोलाचे प्रयत्न केले, याबद्दल मी आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार मानतो.

आगामी जिल्हा परिषदा, तालुका पंचायतींच्या त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण जोरदारपणे काम करू, जेणेकरून आपले जास्तीत जास्त जिल्हा परिषद अध्यक्ष व जि. प. सदस्य, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य तसेच महानगरपालिकेतील महापौर व नगरसेवक निवडून येतील. यादृष्टीने आपण प्रत्येकाने एकत्र येऊन प्रामाणिकपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.

या निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवाव्यात, हे आपले मूलभूत धोरण आहे व त्यानुसार सर्वपक्षीय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये यापूर्वीच चर्चा झालेली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक या अ+, अ, ब श्रेणीतील महानगरपालिका क्षेत्रफळाच्या व प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनक्षम असल्याने त्यांचेसहित सर्व शहर जिल्हाध्यक्षांनी जागा वाटप व उमेदवार निवडीबाबत आपल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करून सुस्पष्ट अहवालासह माझ्या बरोबर चर्चा करावी.

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात जिल्हा अध्यक्ष व विभागातील विद्यमान लोकप्रतिनिधींनी (खासदार/आमदार) यांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांशी चर्चा करावी. आपल्या पक्षातील इतर पदाधिकारी किंवा नेत्यांचे याबाबत काही मत असेल तर त्यांनी जिल्हाध्यक्ष व विद्यमान लोकप्रतिनिधींकडे चर्चा करावी.

समाजमाध्यमांवर जबाबदारीने आणि संयमाने बोलण्याची जबाबदारी फक्त जिल्हाध्यक्ष व विद्यमान लोकप्रतिनिधींची असेल याची काटेकोर दक्षता घ्यावी. तसेच इतर पदाधिकाऱ्यांना त्यांच्या मुद्द्यांबाबत अधिक स्पष्ट चर्चा करायची असल्यास ते माझ्याशी संपर्क साधू शकतात.

आपल्या सर्वांच्या पक्षावरील निष्ठा, कर्तव्यपरायणता आणि एकात्मतेमुळेच आपण या निवडणुकीमध्ये यशस्वी होऊ शकू, याबाबत मला ठाम विश्वास आहे. मी या निवेदनात व्यक्त केलेले विचार सर्वानी गांभीर्याने घेऊन पुढील कार्यवाही करावी, ही विनंती आहे, असं या आदेशात नमूद करण्यात आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT