Sharad Pawar makes big political decision without fielding candidates Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Politics : शरद पवारांचा मोठा निर्णय, एकही उमेदवार न देता गेम फिरवला; हितेंद्र ठाकूरांची ताकद वाढली!

Sharad Pawar NCP BVA Vasai–Virar Election: वसई-विरार महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार नाही.

संदिप पंडित

Vasai–Virar News : वसई विरारच्या निवडणुकीत आता रंग भरू लागले आहेत.भाजपच्या विरोधात अनेक पक्ष एकत्र येत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने माजी आमदार, ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सुनील भुसारा यांनी बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी पत्र लिहून जाहीर पाठिंबा दिला आहे.

वसई-विरार महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतवण्यात आला नाही. पक्षाने बविआला पाठींबा देत भाजप विरोधात बविआला मजबूत केले आहे.

सुनील भुसारा हितेंद्र ठाकूर यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, वसई-विरार शहर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जनविरोधी धोरणांना रोखण्यासाठी काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीपीएम, कष्टकरी संघटना, आदिवासी एकता परिषद, बहुजन विकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्यात व्यापक लोकशाही आघाडी स्थापन करण्यात आली आहे.

ही आघाडी पालघर जिल्ह्याचे राजकीय हित व पक्षाला योग्य तो सन्मान मिळावा या उद्देशाने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वसई विरार शहर पक्षाचे जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली असून पालघर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा आणि जनतेच्या हिताचा विचार करून, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एकही उमेदवार उभा न करता, पक्षाच्या वतीने आघाडीतील सर्व घटकांना व भाजपविरोधी उमेदवारांना जाहीर व सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात घेतला आहे, असे पत्रात म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT