BMC Election : मुंबईतील 'या' 24 जागांवर अटीतटीचे दुरंगी लढत; ठाकरेंची प्रतिष्ठापणाला, महायुतीशी थेट सामना!

Uddhav Thackeray VS BJP Eknath Shinde: उद्धव ठाकरेंसाठी मुंबई महापालिका निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. दुरंगी लढती अटीतचीच्या होणार असल्याने दिग्गज उमेदवारांसाठी देखील धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Uddhav Thackeray News : मुंबई महापालिका निवडणूक ही उद्धव ठाकरेंसाठी प्रतिष्ठेची झाली आहे. विधानसभेमध्ये मिळालेल्या धक्कानंतर त्यांना या निवडणुकीतून सावरण्याची संधी आहे. त्यात त्यांना राज ठाकरेंची साथ मिळाल्याने ते या निवडणुकीत चमत्कार करतील, असे बोलले जात आहे. मात्र, तब्बल 24 जागांवर त्यांची महायुतीशी थेट लढत होत असल्याने तेथे काय होणार याची धाकधुक कार्यकर्त्यांना आहे.

शहर आणि उपनगरांमघीव 24 दुरंगी लढती लक्षवेधी ठरणार आहेत. माजी महापौर मिलिंद वैद्य आणि माजी महापौर विशाखा राऊत या जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. या उमेदवारांसमोर महायुतीनेही तोडीस तोड उमेदवार दिले आहेत.

प्रभाग क्र. 182 मधून माजी महापौर मिलिंद वैद्य यांना शिवसेना ठाकरे पक्षातून पुन्हा उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात भाजपचे राजन पारकर यांना उमेदवारी दिली आहे. तर, प्रभाग 101 मध्ये माजी महापौर विशाखा राऊत यांच्या विरोधात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर लढत आहेत.

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Mumbai High Court : बिनविरोध निवडणूक आलेल्या उमेदवारांचे नगरसेवकपद जाणार? मनसेची कोर्टात धाव; निवडणूक अधिकाऱ्यांनाही भेटले!

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे बंधू मकरंद नार्वेकर हे प्रभाग 226 मधून लढत आहेत. तेथे त्यांचा सामना अपक्ष उमेदवार तेजल पवार यांच्याशी होतो आहे.

प्रभाक 106 मध्ये भाजपचे उमेदवार आणि पालिकेतील ज्येष्ठ माजी नगरसेवक प्रभाकर शिंदे यांच्या विरुद्ध मनसेचे सत्यवान दळवी निवडणूक रिंगणात आहेत.

सोमय्यांच्या पुत्राविरोधात वंचित

भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक नील सोमय्या यांच्या विरोधात ठाकरेंनी अपक्ष उमेदवाराला पाठींबा दिला आहे. तर, याच वाॅर्डात वंचितच्या वैशाली सकपाळ या देखील लढत आहेत.

दुरंगी लढती अटीतटीच्या

प्रभाग 132 मध्ये भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे याच्याशी शिवसेना ठाकरे गटाच्या क्रांती मोहिले याच्यात अटीतटीची लढत होणार आहे. या दुरंगी लढती अत्यंत प्रतिष्ठेच्या असून त्यासाठी भाजप, शिवसेना पूर्ण ताकद लावणार आहेत

Eknath Shinde | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis
Supreme Court : SC, ST, OBC प्रवर्गाला सर्वात मोठा दिलासा; भरती प्रक्रियेतील आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वपूर्ण निकाल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com