Dhairyasheel Mohite Patil-Sharad Pawar Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Politics : दिल्लीत घडामोडींना वेग, शरद पवारांच्या निवासस्थानी खासदारांची बैठक, धैर्यशील मोहितेंनी सांगितली इनसाईड स्टोरी

Sharad Pawar meeting with MPs in Delhi: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार यांनी शरद पवारांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली. पवार आणि खासदारांमध्ये बैठक झाल्याची माहिती आहे.

Roshan More

Sharad Pawar meeting with NCP MPs: दिल्लीत घडामोडींना वेग आला आहे. बुधवारी रात्री राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व खासदारांनी शरद पवारांची त्यांच्या निवास्थानी भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर सर्व खासदार दोन दिवसांतच शरद पवारांना भेटले. त्यामुळे दिल्लीच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. खासदारांनी मतदारसंघातील कामांविषयी शरद पवारांना माहिती दिली. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीचे अनुभव सांगितले.

खासदार धैर्यशील मोहित पाटील म्हणाले, मोदीसाहेबांकडे जे विषय मांडले ते अनुभव पवारसाहेबांना सांगितले. आमच्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि विषय याविषयी सीएमशी बोलण्याविषयी चर्चा झाली.

विकासकामांना गती मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. त्यानंतर खासदारांनी बुधवारी शरद पवारांची भेट घेतली. या भेटीगाठीनंतर खासदारांच्या मतदारसंघातील विकासकामांना गती मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.

सुळे- तावडेंचा एकत्रित प्रवास

महाराष्ट्र सदन दिल्ली येथे जलजीवन मिशनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आयोजित बैठकीनंतर भाजपचे नेते विनोद तावडे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतून प्रवास केला. संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीसाठी विनोद तावडे आणि सुप्रिया सुळे यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याचे पाहायला मिळाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT