Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा 'भाजपकडे' कल; पडद्यामागे जोरदार हालचाली : थोरल्या साहेबांशी चर्चेची जबाबदारी जयंतरावांकडे

Sharad Pawar NDA alliance Talks: विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात शरद पवारांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाच्या दहा आमदारांपैकी नऊ आमदार उपस्थित होते. बैठकीत जयंत पाटील यांनी प्रत्येक आमदाराशी चर्चा करून एनडीएसोबत जाण्याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे सांगितले जात आहे.
Sharad Pawar NCP likely to join BJP
Sharad Pawar NCP likely to join BJPSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 14 Jul : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष भाजपप्रणीत एनडीएसोबत जाणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षांतर्गत हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर आली असून, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आमदार आणि खासदारांची भूमिका जाणून घेतल्याची माहिती समोर आली आहे.

एका मराठी वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या टप्प्यात विधान भवनात शरद पवारांच्या आमदारांची बैठक झाली. या बैठकीला पक्षाच्या दहा आमदारांपैकी नऊ आमदार उपस्थित होते. बैठकीत जयंत पाटील यांनी प्रत्येक आमदाराशी चर्चा करून एनडीएसोबत जाण्याबाबत त्यांची भूमिका जाणून घेतल्याचे सांगितले जात आहे.

वृत्तानुसार, बैठकीत उपस्थित असलेल्या अनेक आमदारांनी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होण्याऐवजी थेट भाजपप्रणीत एनडीएमध्ये सहभागी होण्याचा पर्याय अधिक योग्य असल्याचे मत व्यक्त केले. मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध होणे आणि २०२९ च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने राजकीय बळकटी मिळवण्यासाठी एनडीएसोबत जाणे गरजेचे असल्याचेही काही आमदारांनी मांडल्याची माहिती आहे.

Sharad Pawar NCP likely to join BJP
Shivsena UBT : खासदार फुटीनंतर ठाकरे अलर्ट! 'तो' पदाधिकारी शिंदेंच्या गळाला लागल्याची चर्चा सुरू होताच नगरसेवकांना मातोश्रीवर हजर राहण्याचे आदेश

या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी आमदारांची भूमिका आणि अपेक्षांबाबत पक्षाचे हायकमांड शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे चर्चा करणार आहेत. सध्या एनडीएसोबत जाण्याचा पर्याय चर्चेत असला तरी अंतिम निर्णय शरद पवार हेच घेतील, असे त्यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Sharad Pawar NCP likely to join BJP
Jalgaon Politics: जळगावच्या राजकारणात दोन सत्ता केंद्र नको! खडसेंच्या भाजप प्रवेशाचा गिरीश महाजन समर्थकांना धसका?

दरम्यान, पक्षाच्या तीन आमदारांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर या बैठकीतील चर्चेची माहिती दिल्याचा दावा संबंधित वृत्तात करण्यात आला आहे. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवागीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com