Sharad Pawar, Narendra Modi Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News : 'NDA'त येण्याच्या मोदींच्या ऑफरची शरद पवारांनी उडवली खिल्ली; म्हणाले...

Sharad Pawar On Narendra Modi : ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत राजकीय असो वा कसलंही सहकार्य होऊ शकत नाही, अशा शब्दात पवारांनी मोदींची खिल्ली उडवली.

Chetan Zadpe

Maharashtra News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नंदुरबार येथील जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची जाही ऑफर दिली आहे. शरद पवार यांनी नुकतेच प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी भविष्यवाणी केली होती. यावर मोदी यांचे हे ताजे वक्तव्य आले आहे. काँग्रेसमध्ये जावून मरण्यापेक्षा आमच्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत या, असे मोदी म्हणाले. यावर आता पवारांनी मोदींच्या ऑफरची खिल्ली उडवली. (Latest Marathi News)

"आज मोदींमुळे भारतीय संसदीय लोकशाही धोक्यात आली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. केंद्र सरकारचा याला पाठबळ असल्याशिवाय अशी गोष्ट होऊ शकत नाही. केंद्राचा हात असल्याशिलाय असं होऊ शकत नााही. ज्यांचा संसदीय लोकशाहीवर विश्वास नाही, त्यांच्यासोबत राजकीय असो वा कसलंही सहकार्य होऊ शकत नाही," अशा शब्दात पवारांनी मोदींची खिल्ली उडवली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

महाराष्ट्रातील एका दिग्गज नेत्याने बारामतीतील (Baramati) निवडणूक संपल्यानंतर एक विधान केले आहे. ते इतके हताश आणि निराश झाले आहेत की, त्यांना वाटते चार जूननंतर राजकीय जीवनात टिकून राहायचे असेल तर छोट्या-छोट्या राजकीय पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हायला हवे, असे मोदी म्हणाले.

पुढे बोलताना मोदींनी थेट ऑफर दिली. ते म्हणाले, 'याचा अर्थ नकली एनसीपी आणि नकली शिवसेनेने काँग्रेसमध्ये जाण्याचे ठरवले आहे. चार जूननंतर काँग्रेसमध्ये जाण्याऐवजी छातीठोकपणे अजितदादा आणि शिंदेंसोबत यावे, तुमची सर्व स्वप्न पूर्ण होतील, अशी ऑफर नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT