Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : शिवसेनेच्या पक्ष अन् चिन्ह्याच्या कोर्टात सुनावणी, शरद पवारांनी स्पष्टच सांगितले, 'लगेच यावर...'

Sharad Pawar on Shiv Sena Case : शरद पवारांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या पक्ष अन् चिन्ह्याच्या कोर्टातल सुनावणी, साखर आयात, जीडीपी विविध मुद्यांवर भाष्य केले.

Roshan More

Sharad Pawar News : सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सुनावणी सुरू आहे. एकनाथ शिंदेंचे वकील आपली बाजू मांडत आहेत. दरम्यान, या सुनावणीबाबत पत्रकारांनी शरद पवारांना नेमका निकाल काय असेल याबाबत विचारला केली.

त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, 'या निकालात काय होईल हे आत्ताच सांगता येत नाही, कारण न्यायालयात अजूनही सुनावणी सुरूच आहे. सुनावणी पूर्ण होण्याआधी किंवा निकाल येण्याआधी त्यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही.'

आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी देताना कोर्टाने सरकारला फटकारले. त्यावर बोलताना पवार म्हणाले, 'विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यांच्या काही मागण्या आहेत. त्यासाठी सरकारने स्वीकारलेले धोरण हे न्यायदेवतने सत्य सांगतिले. न्याय देवतेने एक प्रकारे कडक शब्दात सरकारला सल्ला दिला. तुम्ही जर या पद्दतीने निर्णय नाही घेतले आम्हाला निर्णय घ्यायला लागतील. म्हणजे शेवटी न्यायालय प्रशासकीय अधिकारी आपल्या हातात घेतात की काय ही परिस्थिती या सरकारने आणली आहे.'

साखरेचे दर वाढले आहेत. त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असा दावा केला जात आहे. यावरील प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, अजून तर दिसत नाही, व्हायला पाहिजे. पण शेवटी दर वाढतायेत उत्पादन खर्च देखील वाढतोय,जो बनवतो, पिकवतो उत्पानाचा काही हिस्सा त्याच्याकडे गेला पाहिजे. आता तसं चित्र दिसत नाही.

साखरचे आयात योग्य नाही

साखर आयात करणं योग्य नाही. कारण ती येईपर्यंत नवीन साखर बाजारात येईल, त्यामुळे आयात साखर येणार कधी त्याचा फायदा काय हे आज सांगता येत नाही, असे देखील ते म्हणाले.

देशाचा जीडीपीचे आकडे वाढल्याचे सांगितले जात आहे. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले, 'अर्थमंत्री ,प्रधानमंत्री अतिशय सुंदर चित्र, सुव्यवस्थेत देश असल्याचे भासवतायते . जे खाली सुरू आहे त्याची दखल घेतली नाही. प्रधानमंत्री आंतरराष्ट्रीय पातळीवर गोष्टी बोलतायेत आणि आज वस्तुस्थिती एका बाजुला आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT