Fake FDA officer : तुकाराम मुंढेंच्या नावाने खंडणी, तब्बल 60 हॉटेल्समधून वसूली, एक चूक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kolhapur Fake FDA Officer arrested : महादेव लोहार व यादव ग्रामीण भागात फिरायचे. नाश्‍ता सेंटर, हॉटेल्सच्या बोर्डवर दिसणाऱ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून छाप्याची धमकी देत पैशांची मागणी करत होते. आतापर्यंत ५० ते ६० हॉटेल व्यावसायिकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याची प्राथमिक माहिती आहे.
Kolhapur Fake FDA Officer | ₹10 Lakh Extortion Scam
Kolhapur Fake FDA Officer | ₹10 Lakh Extortion ScamSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 03 Sep : अन्न आणि औषध विभागात तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यभरात खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर निर्बंध आले आहेत. कायद्याच्या चौकटीत राहून व्यवसायाला सूट दिल्यानंतर राज्यभरात एफडीआय या विभागाकडून नियम न पाळणाऱ्या हॉटेल्स आणि खाद्यपदार्थ विक्री हातगाड्यांवर धाडसत्र सुरू आहे.

याचाच गैरफायदा घेत कोल्हापुरात शाहूवाडीत एकाने एफडीआयचा तोतया अधिकारी बनून खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नाश्ता सेंटरवर छाप्याची भीती घालून १० हजार रुपयांची खंडणी मागणारा अन्न व औषध प्रशासनाच्या तोतया अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

महादेव नामदेव लोहार (वय ३५, रा. सुतार गल्ली, गोगवे, ता. शाहूवाडी) असे संशयिताचे नाव आहे. त्याचा साथीदार प्रशांत सर्जेराव यादव (रा. बांबवडे , ता. शाहूवाडी) पसार झाला. याबाबत धनाजी मारुती पाटील (३८, रा. सुळे, ता. पन्हाळा) यांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पाटील यांचे विराज नाश्ता सेंटर व पानशॉप सुळे गावी आहे. संशयित लोहार व यादव यांनी फोनवरून पाटील यांच्या नाश्ता सेंटरवर छापा टाकण्यासाठी येत असल्याची भीती घातली. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी असल्याचे सांगून कारवाई टाळण्यासाठी १० हजार रुपयांची मागणी केली. ही रक्कम घेऊन त्यांना लक्ष्मीपुरी परिसरात बोलावले होते.

Kolhapur Fake FDA Officer | ₹10 Lakh Extortion Scam
Maratha protester death : मोठी बातमी! अंतरवाली सराटीत मराठा आंदोलकाचा मृत्यू; जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी गेले ते परतलेच नाहीत

संशयितांबद्दल पाटील यांना शंका आल्याने त्यांनी याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण यांना दिली. सहायक निरीक्षक सागर वाघ यांच्यासह अंमलदार अनिकेत मोरे, अमित मर्दाने, सुशांत तळप, सचिन जाधव, वसंत पिंगळे, विनायक चौगुले यांच्या पथकाने लक्ष्मीपुरी, फोर्ड कॉर्नर परिसरात सापळा रचून तोतया अधिकारी महादेव लोहार याला पकडले.

Kolhapur Fake FDA Officer | ₹10 Lakh Extortion Scam
NCP Sharad Pawar: शरद पवारांचे 5 नगरसेवक सत्ताधारी आघाडीतून बाहेर! शिरूर नगर परिषदेत सत्तासंघर्ष

ग्रामीण भागातील बोर्ड पाहून छाप्याची धमकी

लोहार व यादव ग्रामीण भागात फिरायचे. नाश्‍ता सेंटर, हॉटेल्सच्या बोर्डवर दिसणाऱ्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून छाप्याची धमकी देत पैशांची मागणी करत होते. आतापर्यंत ५० ते ६० हॉटेल व्यावसायिकांकडून त्यांनी खंडणी उकळल्याची प्राथमिक माहिती आहे. लोहारविरोधात यापूर्वीही फसवणुकीचे तीन, तर घरफोडीचा गुन्हा दाखल असल्याचेही उघड झाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com