

हल्लेखोरांनी आधी तीनही सीसीटीव्हीच्या वायरी कापल्या आणि फक्त कांबळे यांच्याच दोन गाड्यांची तोडफोड केली.
दिलीप कांबळेंचा आरोप: हा वाहनांवर नसून माझ्यावर व माझ्या घरावर झालेला नियोजित कट आहे.
पोलीस कारवाई: मुंढवा पोलिसांनी तक्रार नोंदवून वॉचमन व सुपरवायझरला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Pune News : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली असून भाजप नेते आणि माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनांवर अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला करून तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पुण्यातील प्रचंड खळबळ उडाली आहे.
घोरपडी येथील बीटी कवडे रस्त्यावर असलेल्या 'सिटाडेल एम्प्रेस' सोसायटीत ही घटना घडली. दिलीप कांबळे संध्याकाळी कुटुंबासोबत बाहेर गेले असता, रात्री ८ ते ९ च्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्या घराच्या परिसरात प्रवेश केला. हल्लेखोरांनी दगड आणि बांबूच्या साहाय्याने कांबळे यांच्या दोन चारचाकी वाहनांची तोडफोड केली.
विशेष म्हणजे, हल्लेखोरांनी हल्ला करण्यापूर्वी कांबळे यांच्या घराच्या परिसरातील तीनही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या वायरी कापल्या होत्या. तसेच सोसायटीतील इतर कोणत्याही गाडीला स्पर्श न करता केवळ कांबळे यांच्याच वाहनांना लक्ष्य करण्यात आले.
"गाड्यांची केलेली तोडफोड आणि सीसीटीव्हीच्या कापलेल्या वायरी पाहता हा प्रकार नियोजित कट वाटतो. हा केवळ वाहनांवर नसून थेट माझ्यावर आणि माझ्या घरावर झालेला हल्ला आहे," असे कांबळे म्हणाले.
याप्रकरणी दिलीप कांबळे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांनी सुरक्षारक्षक (वॉचमन) आणि सुपरवायझर यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.