Mumbai News : राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महाविकास आघाडी व महायुतीच्या जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले असताना महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चेवेळी वादाची ठिणगी पडली होती.
या बैठकीत शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात वाद झाल्याचे पुढे आले होते. त्यानंतर आता या वादात मध्यस्थी करीत शरद पवार यांनी दिल्लीतील हायकमांडशी चर्चा केली होती. त्यानंतर शनिवारी जागा वाटपातील वाद सोडण्यासाठी काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांना तातडीने मुंबईत पाठवण्यात आले. (MVA News)
शनिवारी जागा वाटपातील वाद सोडण्यासाठी काँग्रेसचे (Congress) राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी पुढाकार घेतला. त्यांनी शनिवारी मुंबईत आल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार, शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा करून पहिल्यांदा संजय राऊत व नाना पटोले यांच्यात झालेल्या वादावर तोडगा काढला.
महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून रस्सीखेच पाहवयास मिळते. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जागावरून शिवसेना ठाकरे गट व काँग्रेस नेते यांच्यात मतभेद आहेत. हे मतभेद दूर करून काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मध्यस्थी करीत राऊत-पटोले यांच्या वादावर पडदा टाकला.
त्यानंतर नाना पाटोले-संजय राऊत यांनी एकत्र येत पत्रकार परिषद घेतली. त्यासोबतच महाविकास आघाडीत मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर विदर्भातील काही जागावरून काँग्रेस व शिवसेनेत (Shivsena) मतभेद असल्याचे पुढे आले होते. त्या जागेवर चर्चा करण्यासाठी आघाडीची बैठक शनिवारी सायंकाळी होत आहे. त्यामुळे येत्या काळात लवकरच आघाडीतील अडलेल्या जागेवर तोडगा निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वांचेच या बैठकीकडे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.