Pune News : राज्यातील 'महायुती' सरकारने ऐतिहासिक 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी कर्जमाफी योजना' लागू केली आहे. मात्र या कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना कधी मिळणार याबाबत वेगवेगळ्या तारखा देण्यात येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
विरोधक देखील सरकारच्या तारीख पे तारीख या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत असून शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफी मिळणार का ? असा सवाल करत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफी वरून इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार या योजनेमुळे राज्यातील ५६ लाख शेतकऱ्यांना एकूण ३६ हजार ५८५ कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. मात्र ही कर्जमाफी नेमकी शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत स्पष्टता आलेली नाही. नुकताच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी 30 जुलै पर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं सांगितलं आहे. मात्र ही तारीख पाळी जाणार का ? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
याबाबत विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना शरद पवार म्हणाले, 'ठीक आहे, त्यांनी जी नवी तारीख घेतली आहे, तोपर्यंत आम्ही वाट पाहू. मुळात त्यांनी यापूर्वी कर्जमाफी बाबत जाहीर केलेल्या तारखा पाळायला हव्या होत्या, पण आता त्यांनी तसे न करता नवी तारीख जाहीर केली आहे. त्यामुळे नवीन तारखेपर्यंत आम्ही थांबणार आहोत. ही कर् माफी आज किंवा उद्या होणार यापेक्षा ही शेतकऱ्याला कर्जमुक्त करणे हे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. जर सरकारने कर्जमाफी केली तर आमची कोणतीही तक्रार नाही, मात्र ती केली नाही तर आमचे आंदोलन सुरू होईल.', असा इशारा शरद पवार यांनी दिला.
सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून उचलून नेले. त्यानंतर शरद पवार यांनी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे. ते म्हणाले, आंदोलकांची मागणी नेमकी कशासाठी होती आणि ती कोणाच्या हिताची होती, हे अगदी स्पष्ट आहे. या बाबत नोटीस देखील देण्यात आल्या होती. तसेच हे आंदोलन दिल्लीत सुरू असताना देखील त्या ठिकाणी साधं कुणी भेटायला किंवा संवाद साधायलाही येत नाही, यावरून त्यांचा उद्दामपणा स्पष्टपणे समोर येत आहे. केंद्र सरकार किती बेजबाबदारपणे आणि चुकीच्या पद्धतीने वागत आहे, हेच यातून सिद्ध होते. हे प्रकरण इथेच थांबणार नसून, उद्या पार्लमेंट सुरू झाल्यावर याच विषयावरून ते गाजणार आहे. असा इशारा शरद पवारांनी दिला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.