Sharad Pawar: सोनम वांगचुक यांच्या अटकेनंतर शरद पवारांचा मोदी सरकारला मोठा इशारा; नेमकं काय म्हणाले?

Sharad Pawar ON Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्यानंतर शरद पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली. सरकारचा उद्दामपणा असल्याचा आरोप करत संसदेत हा मुद्दा गाजणार असल्याचा इशारा दिला.
Sharad Pawar ON Sonam Wangchuk: News
Sharad Pawar ON Sonam Wangchuk: NewsSarkarnama
Published on
Updated on

Pune News : गेल्या 20 दिवसांपासून बेमुदत उपोषणावर असलेले लडाखचे प्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलनस्थळावरून उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दरम्यान, तब्येत खालावल्यामुळे उपोषणावर बसलेल्या वांगचुक यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले आहे.

दुसरीकडे, दिल्ली पोलीस जंतर-मंतरवर आंदोलकांविरोधात अत्यंत कठोर कारवाई करीत आहे. तिथे उपस्थित लोकांना मारहाण केली जात असल्याचा आरोप होत आहे. सोनम वांगचुक यांना बळजबरीने ताब्यात घेतले जात असतानाच, पोलिसांनी आपल्यालाही मारहाण करत ताब्यात घेतल्याचे कोक्रॉच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे सांगितले आहे.

या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी याबाबत सरकारवर टीका करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शरद पवार म्हणाले, "केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आंदोलनाद्वारे मागितला जात आहे. कारण ज्या शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी अत्यंत काळजीपूर्वक पावले उचलणं आवश्यक होती ती उचलली नाहीत आणि त्याचाच परिणाम म्हणून हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले आहे.

Sharad Pawar ON Sonam Wangchuk: News
Nashik Crime: एकतर्फी प्रेमातून अमळनेरच्या विद्यार्थिनीची नाशिकमध्ये भररस्त्यात हत्या, हल्लेखोर युवक पसार

याबाबत मागणी तर करण्यात आली, पण केंद्र सरकारची भूमिका फक्त बघ्याची राहिली. त्यांची मागणी स्पष्ट होती, तरीही त्याच्याकडे दुर्लक्ष करत त्यामुळे इतर राजकीय पक्ष त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. काँग्रेसचे प्रतिनिधी त्यांना भेटले तसेच राष्ट्रवादीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी एकत्र येत सामूहिक मागणी लावून धरली.

त्यामुळे परिस्थिती आपल्या आवाक्याबाहेर जात असल्याचे लक्षात येताच, सरकारने आंदोलन कर्त्याना अटक करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार आज ५ ते ६ जणांना अटक करण्यात आली आहे. पुढे काय होते ते आपण पाहू. त्यांनी जरी अटक केली तरी हे आंदोलन असेच चालू राहणार आहे.

Sharad Pawar ON Sonam Wangchuk: News
SIR Duty: SIRसाठी शिक्षक मतदारांच्या दारावर, विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर? शाळा पडल्या ओस

आंदोलकांची मागणी नेमकी कशासाठी होती आणि ती कोणाच्या हिताची होती, हे अगदी स्पष्ट आहे. या बाबत नोटीस देखील देण्यात आल्या होती. तसेच हे आंदोलन दिल्लीत सुरू असताना देखील त्या ठिकाणी साधं कुणी भेटायला किंवा संवाद साधायलाही येत नाही, यावरून त्यांचा उद्दामपणा स्पष्टपणे समोर येत आहे. केंद्र सरकार किती बेजबाबदारपणे आणि चुकीच्या पद्धतीने वागत आहे, हेच यातून सिद्ध होते. हे प्रकरण इथेच थांबणार नसून, उद्या पार्लमेंट सुरू झाल्यावर याच विषयावरून ते गाजणार आहे, असा इशारा शरद पवारांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com