Sharad Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकींसाठी आढावा बैठका सुरू केल्या आहेत. उद्या गुरुवारी (ता. 19) नगर दक्षिणसह आणखी काही लोकसभा मतदारसंघांची बैठक मुंबईत होत आहे. यासाठी शरद पवार गटाच्या पदाधिकार्यांनी तयारी सुरू केली आहे. महाविकास आघाडीत शरद पवार हे लोकसभेसाठी 15 जागांवर दावा करू शकतात, असे संकेत मिळत आहेत. (Latest Marathi News)
नगर दक्षिण लोकसभेसाठी शरद पवार पहिल्यापासून आग्रही आहेत. या बैठकीत नगर दक्षिण मतदारसंघाची ते चाचपणी करणार आहेत. या बैठकीला आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, माजी आमदार दादा कळमकर, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शौकत तांबोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शरद पवार यांच्याबरोबर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे, खासदार सुप्रिया सुळे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, प्रवक्ते जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आमदार अनिल देशमुख या वेळी उपस्थित असतील.
शरद पवार यांनी आजही मुंबईत काही लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला, तर उद्या (ता. 19) उर्वरित लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे. या आढावा बैठकींमध्ये तब्बल 15 लोकसभा मतदारसंघाचा आढावा शरद पवार घेत आहे. आढावा घेत असलेल्या लोकसभा मतदारसंघांमध्ये कोल्हापूर, हातकणंगले, रावेर, बारामती, सातारा, माढा, शिरूर, हिंगोली, नगर, वर्धा, दिंडोरी, अमरावती, भिवंडी, बीड आणि जालना यांचा समावेश आहे. यामुळे शरद पवार 15 लोकसभा मतदारसंघावर दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2019 लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रात पाच खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर अजित पवार गटाकडे रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे गेले आहेत. उर्वरित खासदार अजूनही शरद पवार यांच्याबरोबर आहेत. राष्ट्रवादीतून बाहेर पडल्यानंतर शरद पवार पुन्हा जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा 2024 च्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने शरद पवार उतरणार असून, शरद पवार महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढवण्याचा चमत्कार करतील, असे बोलले जात आहे.
(Edited By - Chetan Zadpe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.