Sharad Pawar & Jayant Patil Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar Ncp News : महाराष्ट्रात 10 नोव्हेंबरनंतर काय होणार? शरद पवार-प्रफुल्ल पटेल यांच्यातील चर्चेत काय ठरलं? जयंत पाटलांनी क्लिअर केलं

Sharad Pawar and Praful Patel meeting News : मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन प्रफुल पटेल यांनी शरद पवार यांची भेट घेतली.

Sachin Waghmare

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार गेल्या दोन दिवसापासून मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. चार दिवसापूर्वी थकवा जाणवत असल्याने पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून डिस्चार्ज घेतल्यानंतर शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या ठिकाणी भेट घेण्यासाठी नेतेमंडळी येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी गुरुवारी रात्री ब्रीच कँडी रुग्णालयात जाऊन शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली. त्या चर्चेचा फोटो, व्हिडिओ समोर आला आहे. त्यात पवार आणि पटेलांमध्ये एक संवाद आहे. 10 तारखेनंतर बोलू. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे की, शरद पवार 10 तारखेनंतर काय करणार? या पवार-पटेल यांच्यातील चर्चेत नेमके काय ठरले? हे माजी मंत्री जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना क्लिअर केले आहे.

मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात प्रफुल पटेल यांनी त्यांची भेट घेतली. पटेल-पवार भेटीनंतर दोन्ही राष्ट्रवादीचं पुन्हा विलिनीकरण होणार, शरद पवार (Sharad Pawar) यांच्या कन्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि शरद पवार राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील यांनी महत्वपूर्ण भाष्य केले. जयंत पाटील म्हणाले, “शरद पवार यांची प्रकृती ठिक आहे. 10 मिनिटे त्यांच्यासोबत चर्चा झाली. 10 नोव्हेंबरनंतर ते अलीबागला एका कार्यक्रमासाठी येणार आहेत.”

येत्या काळात दोन्ही राष्ट्रवादीचे (NCP) विलिनीकरण होणार नाही. याबाबत शरद पवारांनी आधीच भूमिका मांडली आहे. केवळ अफवा पसरवल्या जात आहेत, असे जयंत पाटील यांनी सांगितले. गोकुळमध्ये घेतलेला निर्णय लोकशाहीला अभिप्रेत असलेला नाही. कायद्याचा दुरुपयोग आहे. महाराष्ट्रात दिवाळीनंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडतील. महाविकास आघाडीचे भविष्य उज्वल आहे, असे जयंत पाटील म्हणाले.

शनिवारपर्यंत मिळणार डिस्चार्ज

शनिवारपर्यंत शरद पवार यांना डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. शरद पवारांचा रुग्णालयातील फोटो समोर आल्यानंतर त्यांना भेटण्यासाठी नेत्यांची रांग लागली आहे. शुक्रवारी सकाळी बाळासाहेब थोरात, उद्योगपती गौतम अदानी यांनी भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करुन शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मंत्री छगन भुजबळ हे सुद्धा त्यांना काल भेटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT