Sharad Pawar : प्रफुल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट, अमित शाह यांच्या सोबतच्या बैठकीबाबत चर्चा?

Praful Patel Meets Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार हे ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी रुग्णालयात शरद पवारांची भेट घेतली.
Praful Patel Meets Sharad Pawar
Praful Patel Meets Sharad Pawarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Sharad Pawar News : अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची ब्रीच कँडी रुग्णालयात भेट घेतली. या भेटीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये शरद पवार हे पटेल यांना 10 तारखेनंतर एकत्र बसून चर्चा करू, असे म्हणताना दिसत आहे.

दरम्यान, या भेटीत शरद पवारांनी अमित शाहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत प्रफुल पटेल यांना विचारणा केली, असे वृत्त साम टिव्हीने सुत्रांच्या हवाल्याने दिले आहे.

या भेटीबाबात बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, राजकीय काय चालले आहे असे विचारत होते. असं आहे की आमची राजकीय भूमिका दुरावली होती. मात्र, मन कधीच दुरावले नव्हते. आणि त्यामुळे पवारसाहेबांना नेहमीच भेटत असतो. आमचे पारिवारीक संबंध आहेत ते राहणारच.

Praful Patel Meets Sharad Pawar
NCP Sharad Pawar : राष्ट्रवादीला गटबाजीचे ग्रहण, प्रदेश उपाध्यक्ष दौऱ्यातून गायब, प्रदेशाध्यक्ष संतापले!

प्रफुल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील इतर नेत्यांनी नुकतीच गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली होती. या भेटीबाबत शरद पवारांनी विचारणा केल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. मात्र, पटेल यांनी त्याला अधिकृत दुजोरा दिला नाही.

पटेल यांना पवारांच्या भेटीबाबत विचारलेल्या एका प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, आमच्यात जनरल चर्चा झाली. हॉस्पिटलमध्ये बाकीच्या चर्चा करणे योग्य नाही, फक्त राजकारणात काय सुरू आहे हे त्यांनी फक्त विचारले.  देशात, राज्यात काय चालले हे त्यांनी विचारले, अमेरिकेचे पण विचारल्याची माहिती पटेल यांनी दिली.

मोदींचा शरद पवारांना फोन

शरद पवार हे पुण्यातील रुग्णालयात दाखल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ नोव्हेंबरला त्यांना फोन केला होता. यावेळी मोदी यांनी पवार यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. तसेच, तब्येतीची काळजी घेण्याचा आणि सध्या पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्लाही दिला होता. ते म्हणाले होते की, आपण आपल्या तब्येतीची योग्य काळजी घ्या, कोणतीही चिंता करू नका आणि पूर्ण विश्रांती घ्या, असे सांगितले.

Praful Patel Meets Sharad Pawar
Narendra Modi Calls Sharad Pawar: पंतप्रधान मोदींचा शरद पवारांना फोन; तब्येतीची विचारपूस करत दिला विश्रांतीचा सल्ला, सुप्रिया सुळेंबाबत काय म्हणाले?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.