Sharad Pawar and Uddhav Thackeray Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar News: ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत; पवारांचं मोठं विधान

Maharashtra Politics: ...म्हणून जेपीसी चौकशीला विरोध करणार नाही!

सरकारनामा ब्यूरो

Mumbai News : मागील वर्षी जून महिन्यात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार व १३ खासदारांनी बंडखोरी केली होती. यामुळे उध्दव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आणि महाविकास आघाडी सरकारला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ठाकरेंच्या राजीनाम्यावर मोठं भाष्य केलं आहे.

शरद पवार (Sharad Pawar ) यांनी एबीपी माझाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अदानी, जेपीसी, पहाटेचा शपथविधी, फडतूस-काडतूसवरुन रंगलेलं राजकारण यांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी उध्दव ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या राजीनाम्यावरही प्रतिक्रिया दिली आहे.

पवार म्हणाले,मुख्यमंत्रीपदासह इतर पदे तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन संख्येच्या वरुन तयार झाली होती. यामध्ये तिन्ही पक्षांचा सहभाग होता. त्या संबंधित दुसरा निर्णय जर कोणी घेत असेल, राजीनामा देत असेल, त्यांचा तो अधिकार आहे.

पण उध्दव ठाकरेंनी राजीनामा देताना अन्य सहकारी पक्षांसोबत चर्चा करण्याची आवश्यकता होती. चर्चा न करता निर्णय घेण्याचा दुष्परिणाम होतात. त्यावेळी चर्चा झाली नाही, ही वस्तुस्थिती नाकारता येऊ शकत नाही असं पवार म्हणाले.

...म्हणून जेपीसी चौकशीला विरोध करणार नाही!

अदानी प्रकरणात जेपीसी चौकशीच्या मागणीवरुन शरद पवार आणि काँग्रेसमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. मात्र, आता पवारांनी जेपीसीच्या मागणीवर आपल्या भूमिका स्पष्ट केली आहे.

पवार म्हणाले, जर सहकाऱ्यांना जेपीसी आवश्यक वाटत असेल तर विरोध करणार नाही. मित्राचं मत माझ्यापेक्षा वेगळं आहे. पण आम्हाला यात ऐक्य ठेवायचं आहे. माझं मत मी मांडलं. पण सहकाऱ्यांना वाटत असेल की जेपीसी पाहिले, तर मी त्याला विरोध करणार नाही. त्यांच्या मताशी सहमत नाही पण विरोधकांची एकीवर दुष्परिणाम होऊ देणार नाही असं पवार यांनी यावेळी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT