Sharad Pawar  Sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : लोकसभा निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, "मी सांगेल, तेच उमेदवार..."

Political News : आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मी सांगेन, तेच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढतील.

Sachin Waghmare

Ncp Political News : गेल्या निवडणुकीत काही जण राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले होते. त्या सोडून गेलेल्यांनी माझ्या नावाने मते मागितली होती. माझ्या पक्षातून आधी गेले ते निवडून आले नाहीत. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी मी सांगेन, तेच उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढतील, असे शरद पवारांनी स्पष्ट केले.

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर शरद पवार (Sharad Pawar ) यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. कोणत्याही समाजाची मागणी असेल तर तो मांडण्याचा अधिकार त्यांना आहे. हे करत असताना अन्य समाजाचा अधिकार हिरावून घेत मागणी करणे आणि समाजात ऐक्य बिघडवून परिस्थिती निर्माण करणे योग्य नाही. कोणत्याही समाजाने आपल्या मागण्या संसदीय पद्धतीने कराव्यात, राज्यात सामाजिक ऐक्य जतन केले पाहिजे. जाती-जातीत तेढ निर्माण होईल, असे कोणीच वागू नका, असा सल्ला या वेळी त्यांनी दिला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सत्य किती असत्य किती हे नागरिकांना माहीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) स्थापना कोण केली, हे सर्वाना ठाऊक आहे. त्यामुळे मी वेगळे सांगण्याची गरज नाही. ते जरी दावा करत असतील तरी त्याच्याकडे फारसे लक्ष देण्याची वेळ नाही. लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे त्यांना सारखे सांगावे लागते, आमचा पक्ष खरा आहे.

गेल्या काही दिवसांपासून इंडिया आघाडीतील नेतेमंडळी पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत व्यस्त होते. उद्या पाच राज्यांतील मतमोजणी पार पडेल. त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक पार पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

योग्य वेळ आली की माझ्याकडे किती खासदार आमदार आहेत, हे दाखवेन, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोदींना विजयी करा, यासाठी त्यांना मतदान करा, असे आवाहन अजित पवार करत आहेत, असा प्रश्न विचारला तर तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मोदींनी सिंचन घोटाळ्याचे आरोप कोणावर केले ते शोधा, असे आवाहन त्यांनी केले.

(Edited by Sachin Waghmare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT