Sharad Pawar sarkarnama
महाराष्ट्र

Sharad Pawar : राज्यातील 'या' मतदारसंघात बंडखोरी; शरद पवारांचे टेन्शन वाढले ?

NCP SP Internal Conflict: अनेक मतदारसंघात मित्र पक्षातच लढत होणार आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सर्वच पक्षाचे टेन्शन वाढले आहे.

Sachin Waghmare

Mumbai News : लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी कुठला पक्ष किती आणि कोणत्या जागा लढणार हे जाहीर करण्यात आले होते. विधानसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडी व महायुतीच्या वाट्याला किती जागा येणार याचा वाद शेवटपर्यंत मिटवता आलेला नाही.

एका मतदारसंघावर एकापेक्षा जास्त मित्र पक्षाने शेवटपर्यंत कोण किती आणि कोण कोणत्या जागेवर लढणार याची यादी जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक मतदारसंघात मित्र पक्षातच लढत होणार आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात बंडखोरी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सर्वच पक्षाचे टेन्शन वाढले आहे.

शरद पवार पक्षाने विधानसभा निवडणुकीची तयारी पूर्ण केली आहे. शरद पवार गटाने राज्यात 80 हून अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. राज्यातील काही विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटापुढे अजित पवार गटाचे आव्हान असणार आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

त्यातच शरद पवार गटाला राज्यात बंडखोरांचे मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे ही बंडखोरी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. लोकसभेप्रमाणे चांगला स्ट्राइक रेटसाठी त्यांचा प्रयत्न असणार आहे.

शरद पवार गटाकडुन काही इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे या बंडखोरांना शमवण्याचं आव्हान असणार आहे. राज्यातील सात विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना बंड थंड करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे येत्या 4 नोव्हेंबरपर्यंत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात या जागी बंडखोरी झाली आहे. त्यामध्ये मोहोळमध्ये संजयअण्णा क्षीरसागर, बेलापूरमध्ये मंगेश आमले, मुरबाडमध्ये शैलेश वडनेरे, माजलगावमध्ये रमेश आडसकर, इंदापूरमध्ये प्रवीण माने, बीडमध्ये ज्योती मेटे, आष्टी: साहेबराव दरेकर आणि राम खाडे या बंडखोर उमेदवाराची समजूत काढावी लागणार आहे.

राज्यातील काही विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटापुढे अजित पवार गटाचंच आव्हान असणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार गटाने कंबर कसरली आहे. शरद पवार गटाने राज्यात 80 हून अधिक जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

शरद पवार गटाने काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर नाराजांची संख्येतही भर पडली आहे. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यामुळे या बंडखोरांना शमवण्याचं आव्हान असणार आहे.

राज्यातील सात विधानसभा मतदारसंघात शरद पवारांना बंड थंड करण्याचं आव्हान असणार आहे. त्यामुळे 4 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची तारीख आहे. त्यामुळे शरद पवार गटाला 4 तारखेपर्यंत मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे.

दरम्यान, शरद पवार गटाकडून आतार्यंत 88 उमेदवारांची घोषणा झाली. शरद पवार गटाने पहिल्या यादीत 45 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. त्यानंतर दुसऱ्या यादीत 22 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर तिसऱ्या यादीत 9 तर चौथ्या यादीत 7 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. तसेच पाचव्या यादीत शरद पवार गटाने 5 जणांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. आता सर्वांचेच माघार कोण घेणार ? याकडे लक्ष लागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT