Nanded News : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली. त्यानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील जागावाटपाचा पेच अजूनही कायम असल्याचे दिसते. यातून पक्षांतर्गत वाद, मित्रपक्षांतील कलह वारंवार समोर येत आहेत.
राज्यात विविध ठिकाणी मित्रपक्षांचे उमेदवारच एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. तर दुसरीकडे नांदेड लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व काँग्रेसकडून एकमेकांवर केल्या जात असलेल्या आरोपामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. (Sachin Pilot News)
नांदेडमधून मोठी बातमी समोर आली आहे. दोन दिवसापूर्वी माजी मुख्यमंत्री व भाजपचे नेते अशोक चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपच्या जाहीर सभेत बोलताना काँग्रेसवर सडकून टीका केली होती. आपण काँग्रेसमध्ये होतं असलेल्या छळामुळे पक्ष सोडल्याचे त्यांनी सांगितले होते. चव्हाण यांनी केलीली टीका काँग्रेसच्या चांगलीच जिव्हारी लागली असल्याचे दिसत आहे.
एक दोन नेत्यांच्या जाण्याने काँग्रेसला काही फरक पडत नसल्याची प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते व राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी दिली आहे. चव्हाण यांनी भाजपच्या जाहीर सभेत आपण काँग्रेसमध्ये होत असलेल्या छळामुळे पक्ष सोडल्याचे सांगितले होते. त्यावर पायलट यांनी ही तिखट प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण चांगलेच तापले आहे.
नांदेड लोकसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणूक होत आहे. येथील खासदार वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे चिरंजीव रवींद्र चव्हाण यांना रिंगणात उतरवले आहे. तर भाजपने या निवडणुकीसाठी अशोक चव्हाण यांचे विश्वासू सहकारी संतुक हंबर्डे यांना रिंगणात उतरवले आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.