Shegav Nagarpalika  Sarkarnama
महाराष्ट्र

Shegaon Municipal Council Politics : काँग्रेसचा नगराध्यक्ष थेट भाजपच्या बैठकीत; गटनेत्याने तडकाफडकी दिला राजीनामा, वेगवान घडामोडीने शेगावचे राजकारण तापले!

Shegaon politics heats up News : भाजपचे गटनेते शरद अग्रवाल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. या वेगवान घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात काय घडामदी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sachin Waghmare

Shegav News : शेगाव नगरपरिषदेच्या राजकारणात शुक्रवारी अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. भाजपच्या बैठकीला थेट काँग्रेसचे नगराध्यक्ष उपस्थित राहिल्याने शहराच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. काँग्रेसचे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार उपस्थित राहिल्याने राजकीयदृष्ट्या वेगळे महत्व प्राप्त झाले आहे. त्यातच भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार डॉ. संजय कुटे यांच्या उपस्थितीत झालेल्या नगरसेवकाच्या बैठकीतच आणखी एक मोठी घडामोड घडली. भाजपचे गटनेते शरद अग्रवाल यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. या वेगवान घडामोडीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात काय घडामदी घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शेगाव येथील विश्राम गृहात 28 ऑगस्टला भाजपच्या नगरसेवकाची बैठक पार पडली. त्यामुळे चर्चेला उधाण आले होते. शेगाव येथील विश्राम भवनात आमदार डॉ. संजय कुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेमधील भाजपच्या नगरसेवक व नगरसेविकांची बैठक झाली. नगर परिषदेतील आगामी कामकाज, शहर विकास तसेच विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. याच बैठकीदरम्यान शरद अग्रवाल यांनी गटनेतेपदाचा राजीनामा आमदार डॉ. कुटे यांच्याकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे.

याच भाजपच्या बैठकीला काँग्रेसचे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली आहे. त्यांची उपस्थिती कोणत्या राजकीय समीकरणाचा भाग असल्याचे पुढे आलेले नाही. नगरपरिषदेत राजकीय समीकरण बाजूला ठेऊन सर्वानी एकत्रित काम करण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली असल्याचे समजते. काँग्रेसचे नगराध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहिले असल्याने भविष्यातील राजकीय समीकरणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

भाजप नगरसेवकांच्या बैठकीतच राजीनामा

अग्रवाल यांनी यापूर्वीही सुमारे दोन महिन्यांपूर्वी नगरपरिषदेतील राजकीय घडामोडींमुळे राजीनामा देण्याची भूमिका घेतल्याची चर्चा होती; मात्र आता त्यांनी प्रत्यक्ष भाजप नगरसेवकांच्या बैठकीतच आमदार डॉ. कुटे यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्याने या निर्णयाची राजकीय चर्चा अधिक रंगली आहे.

त्यांच्या राजीनाम्यामागे सध्या कोणतेही राजकीय कारण असल्याचे अधिकृतपणे समोर आलेले नाही. असे असले तरी गटनेतेपदाचा राजीनामा आणि त्याच बैठकीत अराजकीय उपस्थिती यामुळे तर्क-वितर्क लावले जात आहेत. अग्रवाल यांनी भाजपच्या गटनेतेपदाचा राजीनामा दिला असला तरी येत्या काळात त्यांचा राजीनामा स्वीकारला जाणार का? याबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही. तयार दुसरीकडे त्यांचा राजीनामा मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

डॉ. संजय कुटे यांच्या निर्णयाकडे लक्ष

भाजपचे आमदार डॉ. संजय कुटे यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. काँग्रेसचे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकर यांची भाजपच्या बैठकीला उपस्थिती ही आगामी शेगावच्या राजकारणातील नव्या समीकरणांची सुरुवात ठरते का? याचीही चर्चा सुरु झाली आहे. त्यातच भाजप गटनेत्याच्या राजीनाम्याबाबत डॉ. कुटे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT